तब्बल ३३ वर्षांनंतर राहूरी फॅक्टरी येथे भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा


तब्बल ३३ वर्षांनंतर राहूरी फॅक्टरी येथे भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

राहूरी फॅक्टरी

महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी-विजय एस भोसले

राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल सन १९८७-८८ बॅचच्या माजी  विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. गेल्या ३३ वर्षानंतर ५३ विद्यार्थी व शिक्षक यांनी आपली मैत्रीची जपवणूक करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.  दुधाळ सर होते यावेळी  विक्रम झिने ,भांड सर,गंगाधर  म्हसे, लक्ष्मण भंडारी सर आदी शिक्षक  उपस्थित होते. प्रारंभी  सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिप प्रज्वलन संपन्न झाले. प्रास्ताविक प्रशांत सुर्यवंशी सर यांनी केले तर प्रदिप कदम,राजेंद्र गरुड,अनिल गागरे,जनार्धन खरात,  रविंद्र गुजाळ,डाॅ नितीन खांदे,मनिष शहाणे,राकेश विजन,निवृत्ती लोखंडे,प्रविण सोनी व इतर माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन विद्या अनारसे-देवकर व विकास शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी उंडे यांनी मानले. पसायदानाने स्नेह मेळाव्याची सांगता झाली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News