भटक्या विमुक्त जमातींना विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी राष्ट्रवादी कटिबध्द -मा. आ. हिरालाल राठोड


भटक्या विमुक्त जमातींना विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी राष्ट्रवादी कटिबध्द -मा. आ. हिरालाल राठोड

विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ज्ञानदेव कापडे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - दीन-दुबळे घटक वंचित राहू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या माध्यमातून कार्य चालू आहे. भटक्या विमुक्त जमातींना विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी राष्ट्रवादी कटिबध्द असून, राष्ट्रवादी पक्षच त्यांना न्याय देऊ शकणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार हिरालाल राठोड यांनी केले. 

राष्ट्रवादी भवन येथे विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सेलचे प्रदेशाध्यक्ष राठोड बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक कुमार वाकळे, ग्रामीणचे अध्यक्ष मनोज (मल्लू) शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रामराव चव्हाण, सरचिटणीस गणेश बोरुडे, पारनेर तालुकाध्यक्ष श्याम पवार, पाथर्डी तालुकाध्यक्ष किसन राठोड आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.  पुढे राठोड म्हणाले की, भटक्या विमुक्तांना मिळालेले 3 टक्के आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे. हे आरक्षण 15 टक्के होण्यासाठी व इतर एकवीस प्रश्‍न घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे. फक्त संघटना उभ्या करुन प्रश्‍न सुटत नाही, तर पक्षाशी संलग्न संघटना असल्यास शासनस्तरावर प्रश्‍न सोडविले जाऊ शकतात. भटक्या विमुक्त जमातींना राष्ट्रवादी पक्ष न्याय देऊ शकणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

या बैठकित बोल्हेगावचे माजी सरपंच ज्ञानदेव कापडे यांची विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कापडे यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक कुमार वाकळे यांनी ज्ञानदेव कापडे यांचे अनेक वर्षापासून सामाजिक कार्य सुरु आहे. टाळेबंदी काळात त्यांनी अनेक गरजूंना आधार देऊन विविध प्रकारची मदत केली. राष्ट्रवादी पक्षात ते सक्रीय असून, त्यांना सेलची जबाबदारी टाकण्यात आली असल्याचे सांगितले. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी वंचित व गरजूंना आधार देणारा राष्ट्रवादी पक्ष असून, समाजकारण या विचारधारेणे पक्षाशी समाज जोडला जात असल्याचे सांगून कापडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News