दौंडकरांनो सावधान कोरोना वाढतोय,थंडी मुळे दुसऱ्या लाटेची भीती,शहरात 7 तर तालुक्यात 15 पॉझिटिव्ह


दौंडकरांनो सावधान कोरोना वाढतोय,थंडी मुळे दुसऱ्या लाटेची भीती,शहरात 7 तर तालुक्यात 15 पॉझिटिव्ह

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : -दौंड शहर आणि तालुक्यात कोरोना पुन्हा सुरू झाला आहे,थंडी वाढत असल्यामुळे दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे, मागील दोन महिन्यात दौंड कर नागरिकांनी मनापासून काळजी घेतली होती त्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट आली होती,परंतू दिवाळी सर्वानीच धुमधडाक्यात केली, खरेदी साठी तोबा गर्दी केली होती, की कोरोना हा आजार नव्हताच,किंवा होताच तर तो आता हद्दपार झाला अशा प्रकारे वागत होते,लक्षात ठेवा सूट शासनाने दिली आहे, कोरोनाने नाही,त्यात थंडी वाढली त्यामुळे काळजी घेणे काळाची गरज आहे, दौंड तालुक्यात 15 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ यांनी दिली आहे, तर दौंड शहरात दिनांक 24/11/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे 93 जणांचे घस्यातील द्रव (RTPCR) घेतले असून त्यांचे उद्या मिळतील तर  40 जणांची अँटीजेन (rapid antigen) तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले. पैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 33 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये महिला-- 3,पुरूष --4,दौंड शहर=2,ग्रामीण=4,Srpf ---=1 हे सर्व व्यक्ती 16 वर्ष ते 59 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News