व्यापारी संघर्ष समितीच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा- सुनील गंगूले


व्यापारी संघर्ष समितीच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा- सुनील गंगूले

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी:

कोपरगाव शहरातील विस्थापित टपरिधरकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रयत्न केले असून कोपरगाव संघर्ष समितीने विस्थापित टपरीधारकांसाठी हाती घेतलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस च्यावतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे असे म्हटले आहे की,विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न तातडीने सुटावा यासाठी  कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी ठराव मंजूर करून घेतला आहे.मात्र आजपर्यंत सत्ताधारी नगरसेवक टपरीधारकांचा प्रश्न सोडवू शकले नाही हे मोठे दुर्दैव आहे.विस्थापित टपरिधरकांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना आजवर मोठा संघर्ष केला असून लॉक डावूनमुळे त्यांच्या संकटात भरच पडली आहे.हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरसेवकांनी आजपर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून अजूनही लोकशाहीच्या मार्गाने आमचा पाठपुरावा सुरूच आहे.मात्र कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने उचलेलं आंदोलनाचं पाऊल झोपलेल्या सत्ताधारी नगरसेवकांना जागी करण्याचं काम करणार असून टपरिधारकांच्या होत असलेल्या हाल अपेष्टा थांबविण्यासाठी आम्ही या आंदोलनाला पाठींबा देत असल्याचे सुनील गंगूले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News