मोरया ग्रुपच्या वतीने सायकलवरून अष्टविनायक यात्रा पूर्ण


मोरया ग्रुपच्या वतीने सायकलवरून अष्टविनायक यात्रा पूर्ण

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील मोरया सायकल ग्रुपच्या आठ तरुणांनी सायकलवरून अष्टविनायक यात्रा नुकतीच पूर्ण केली. बुधवारी १८ नोव्हेंबरला पहाटे पाच वाजता श्री मयूरेश्वर मंदिर मोरगाव येथून यात्रेला या तरुणांनी सुरुवात केली होती. त्यानंतर सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महड, पाली, थेऊर पुन्हा मोरगाव अशी सायकल रॅली अवघ्या शंभर तासांत पूर्ण केली. 

समाजामध्ये घडत असलेल्या वाईट गोष्टींचा नायनाट व्हावा, कोरोनाच्या संकटातून सर्वजण सुखरूप बाहेर पडावे, सध्या व्यसनाधीनतेकडे वळलेल्या तरुणांना सायकलींचे व आरोग्याचे महत्त्व लक्षात यावे. सायकल चालवून पर्यावरणाचा देखील समतोल राखता येतो, या संदर्भातील जनजागृती करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे मत पळशी येथील माणिक काळे यांनी व्यक्त केले. 

या उपक्रमात मोरगावमधील उद्योजक नवनाथ भापकर, माणिक काळे, सोमनाथ साळुके, किरण चांदगुडे, नितीन तावरे, अमोल जराड, वैभव शिंदे व गणेश चौधरी सहभागी झाले होते.

 : सायकलवरून अष्टविनायक यात्रा केल्यामुळे आम्हाला अनेक पटीने शारीरिक, मानसिक व सकारात्मक ऊर्जा मिळाली असे मतही या युवकांनी यावेळी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News