प्रतिबंधीत उजनी पानलोट क्षेत्रात लहान माशांची चोरटी मासेमारी करणारांवर इंदापूर पोलीसांनी केला चोरीचा गुन्हा दाखल .


प्रतिबंधीत उजनी पानलोट क्षेत्रात लहान माशांची चोरटी मासेमारी करणारांवर इंदापूर पोलीसांनी केला चोरीचा गुन्हा दाखल .

श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी ( दि. २३ नोव्हेंबर ) : दिनांक २३/११/२०२० रोजी अकलूज बायपास येथे एका पिकपमध्ये उजणी पानलोट क्षेत्रात लहान माशांची मासेमारी करून ते सुकवून मासळी बाजारात चढया भावाने विकीसाठी घेवून चाललेवाबत इंदापूर पोलीसांना माहीती मिळालेनंतर पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी पोलीस नाईक दिपक पालके, पोलीस शिपाई अमित चव्हाण, विशाल चौधर व विक्रमसिंह जाधव यांचे पथक तयार केले व मिळाले माहीतीवाबत खात्री करण्यास पाठविले असता अकलूज बायपास सरस्वतीनगर येथे पिकअप जिप नंबर एम एच ४२/एक्यु ३०३५ मध्ये एकुण ४८ सुती गोण्यांत वेगवेगळया जातींचे लहान आकाराची सुकवलेली माशांची पिल्ले भरलेली पोती अढळून आली, त्यावेळी जिपमधील नारायण आसाराम बनारे यांना सदर माशाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे देवून त्यांचेकडे मासे पकडण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितलेने पोलीसांनी मिळून आलेली पिकअप मुद्देमालासह पोलीस ठाण्यात आणली, त्यानंतर पाटबंधारे विभाग इंदापूर यांचेशी पत्रव्यवहार केलेनंतर श्री संजय नारायण मेटे, वय ५२ वर्षे, व्यवसाय नोकरी, उपविभागिय अभियांता पळसदेव रा. बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) नारायण आसराम बनारे वय ४३ वर्षे रा. सरस्वतीनगर इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे, २) रोहीदास दौलु बनारे वय २१ वर्षे रा. सदर, ३) आकाश नारायण बनारे वय २१ वर्षे रा. सरस्वतीनगर ता. इंदापूर जि. पुणे, ४) लक्ष्मण नारायण बनारे, वय २३ वर्षे, रा. सदर, ५) विलास नारायण बनारे, वय १९ वर्षे रा. सदर, ६) विठ्ठल कांतीलाल गव्हाणे वय २६ वर्षे रा. पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे, ७) बाळासाहेब वसंत चितारे, वय ३८ वर्षे रा. पिंपरी खु।। ता. इंदापूर जि. युणे, ८) एकनाथ बाळूराव विचारे वय ३२ वर्षे रा. कालठन नंबर २ ता. इंदापूर जि. पुणे यांनी स्यांचेकडे मासे पकडण्याचा पाटबंधारे विभागाकडील कोणताही परवाना नसताना देखील स्वःताचे अर्थिक फायदयाकरीता उजणी जलाशयाचे कालठन नंबर २, सिरसोडी, सुगाव, शहा, कांदलगाव, हिंगणगाव गावचे हद्दीतील पात्रातुन पकडले आहेत व ते सुकवून मासळी बाजारात चढया भावाने विकी करण्यासाठी घेवून जाण्याचे तयारीत असताना मिळून आलने त्यांचे विरोधात इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११४०/२०२० भादविक, ३७९, ३४ सह पाटबंधारे अधिनियम १९७६ चे कलम ९४ (ब)/१०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस नाईक दिपक पालके हे करीत असून त्यांनी गुन्हयात ०७ आरोपी अटक केले व आरोपीकडून १०८० कि. ग्रॅम वजनाचे १,०२,२००/- रू. किमंतीचे वेगवेगळया जातींचे लहान आकाराचे सुकवलेली फिल्ले जप्त केली आहेत. आरोपींना पोलीस कोठडी रिमाड्ाठी मा. इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सातही अटक आरोपींची दिनांक २५/११/२०२० रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. या आरोपींनी उजणी पानलोट क्षेत्रात मोठया प्रमाणावर लहान मासे पकडून ते सुकवून साठा केल्याची माहीती मिळत आहे गुन्हयात पोलीस कोठडी रिमांडमधील आरोपींना स्थानिक मच्छिमार तसेच इतर मदत करणारे साथीदार यांचेवायत पोलीस माहीती काढत असून ज्यांचा या गुन्हयात सहभाग निष्पन्न होईल त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल असे इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायणराव सारंगकर यांनी स्पष्ट केले गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिपक पालके हे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News