भ्याड हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यासाठी भिगवणमध्ये कडकडीत बंद- राजाभाऊ देवकाते.


भ्याड हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यासाठी भिगवणमध्ये कडकडीत बंद- राजाभाऊ देवकाते.

भिगवण (प्रतिनिधी) इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक आबासाहेब देवकाते यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यासाठी भिगवण व परिसरातील व्यापारी वर्गाने आबासाहेब देवकाते मित्रपरिवरच्या वतीने केलेल्या आवाहनाला कडकडीत प्रतिसाद म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला. 

यावेळी आबासाहेब देवकाते मित्र परीवार यांच्या वतीने हल्लेखोराना अटक करण्याबाबतचे निवेदन भिगवण पोलीसस्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे नेते  ॲड. महेशदादा देवकाते पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष सचिन बोगावत, भिगवणचे मा.उपसरपंच प्रदिप वाकसे, खानोटयाचे मा.बबनराव धायतोंडे मदनवाडी ग्रामपंचायतचे सदस्य राजाभाऊ देवकाते रवींद्र देवकाते संतोष देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

भिगवण व इंदापूर तालुक्यातील एक नामवंत व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आपले नावलौकिक केलेल्या जबाबदार व्यक्तीवर झालेला हल्ला भ्याड असून पोलीस प्रशासनाच्या वतीने अजून देखील कठोर पावले उचलली दिसत नाहीत.म्हणून दहा दिवस झाले तरी आरोपी फरार असल्याने पोलीस प्रशासनाने तत्काळ सदर आरोपीस अटक करुन अशा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा घालुन सामान्य माणासाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कार्यकर्त्याकडुन केली जात आहे. सदर आरोपी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातील असल्याने त्यांना अजून देखील अटक झालेली नसल्याने आबासाहेब देवकाते मित्रपरिवरच्या वतीने आज  मंगळवारी भिगवण बंदच्या केलेल्या आवाहनाला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निषेध व्यक्त केला .सदर सर्व व्यापारी वर्गाचे दिलेल्या पाठिंब्याला आबासाहेब देवकाते मित्रपरिवरच्या वतीने आभार व्यक्त केले.सदर बंद कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्तरप्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News