केडगाव भागात चोरीचे सत्र सुरू असल्याने रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी - नगरसेवक विजय पठारे


केडगाव भागात चोरीचे सत्र सुरू असल्याने रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी - नगरसेवक विजय पठारे

(प्रतिनिधी संजय सावंत ) नगर -दिवाळी सणा निमित्त बाहेर गावी गेलेले अनेक परिवार आता आपआपल्या घरी परतत आहे परंतु बंद घर असल्याने त्यांना त्यांचे घरी चोरी झाल्याचे लक्षात येत आहे केडगाव भागातील अनेक भागात गेल्या काही महिन्यापासून भूषणनगर ,शिवाजीनगर ,लिंक रोड ,वैष्णव नगर ,लालनगर ,एकनाथनगर ,मराठा नगर या भागामध्ये घरफोडी ,जबरी चोरी ,दरोड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढलेले आहे यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने या भागामध्ये रात्रीची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणीचे निवेदन नररसेवक विजय पठारे यांनी या भागातील नागरिकासह कोतवाली पोलीस यांना दिले आहेत यावेळी प्रफुल साळुंके ,चेतन वर्मा ,सागर कणसे ,चेतन राऊत ,सोनू परदेशी आदी उपिस्थत होते . 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News