महाआवास योजना शहरी व ग्रामीण भागात कार्यान्वीत करावी!! प्रत्येक जिल्ह्यात महाआवास ट्रॅब्युनल स्थापना करण्याची मागणी!! मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्रींना निवेदन


महाआवास योजना शहरी व ग्रामीण भागात कार्यान्वीत करावी!!  प्रत्येक जिल्ह्यात महाआवास ट्रॅब्युनल स्थापना करण्याची मागणी!!  मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्रींना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - राज्य सरकारने 19 नोव्हेंबर पासून घरकुल वंचितांसाठी महाआवास योजना जाहीर केली असून, ही योजना शहरी व ग्रामीण भागात कार्यान्वीत करुन प्रत्येक जिल्ह्यात महाआवास ट्रॅब्युनलची स्थापना करण्याची मागणी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

हक्काची घरे मिळण्यासाठी घरकुल वंचितांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, प्रमिला घागरे, हिराबाई शेकटकर, पुष्पांजली थोरात, राणी सुरेकर, शारदा भालेकर, लतिका पाडळे, फरिदा शेख, सुरेखा आठरे, संगीता चव्हाण आदिंसह घरकुल वंचित उपस्थित होते.

पंतप्रधान आवास योजनेची घोषणा होऊन अनेक वर्ष लोटली. मात्र महाराष्ट्रात घरकुल वंचितांसाठी एकही मोठा प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. शहरात जागा नसल्याने ही योजना बारगळली आहे. संघटनेच्या वतीने घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना सुरु करण्यात आली असून, शहरालगत असलेल्या पड जमीनीवर जागा मालकाच्या संमतीने ही योजना पुर्णत्वास नेली जात आहे. इसळक-निंबळक येथे लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून घरकुल वंचितांचा पहिला प्रकल्प उभा राहणार आहे. शहरात जागा नसल्याने सरकारला शहरालगत असलेल्या खडकाळ पड जमीनी ताब्यात घेऊन घरकुल वंचितांसाठी प्रकल्प उभारावा लागणार आहे. जे घरकुल वंचित ग्रामीण भागात घर मिळण्यासाठी  तयार असतील त्यांची नांवे शहरातून वगळून ग्रामीण यादीत टाकावीत. तसेच शहरालगत ग्रामीण भागात घरकुल वंचितांचे प्रकल्प उभे राहत असताना त्या भागात रस्ते, वीज व पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच घरकुल वंचितांचे प्रश्‍न सोडविण्यास प्रत्येक जिल्ह्यात महाआवास ट्रॅब्युनल स्थापन  करण्यास संघटना आग्रही आहे.  राज्य सरकारने घरकुल वंचितांसाठी जाहीर केलेली महाआवास योजना शहरी व ग्रामीण भागात कार्यान्वीत करुन प्रत्येक जिल्ह्यात महाआवास ट्रॅब्युनलची स्थापन करण्याची मागणी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, प्रमिला घागरे, हिराबाई शेकटकर, पुष्पांजली थोरात, राणी सुरेकर, शारदा भालेकर, लतिका पाडळे, फरिदा शेख, सुरेखा आठरे, संगीता चव्हाण आदि. (छाया-वाजिद शेख-नगर)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News