कोपरगाव तालुका व शहर युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर !! तुषार पोटे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी !


कोपरगाव तालुका व शहर युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर !! तुषार पोटे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव -महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,प्रदेश महासचिव करण ससाणे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे,जिल्हा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष तुषार पोटे,कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.२२नोव्हेंबर रोजी संगमनेर येथे युवक स्नेहमेळाव्यात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस निवडी जाहीर करून युवकांची जिल्हाभर मोटबांधली.कोपरगावतून १४ वर्षांपासून थोरात गटाचे एकमेव एकनिष्ठ तथा २००६ साली च्या विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष पदापासून सुरुवात करणारे व पक्षात सत्ता नसतानाच्या काळात देखील सक्रीय असलेले जिल्हा युवक कॉंग्रेसचे महासचिव तुषार पोटे यांना बढती देत जिल्हा उपाध्यक्ष व उत्तरजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे कळाले,त्यांच्या सूचनेनुसार नवनियुक्त कोपरगाव कार्यकारिणी पुढील प्रमाणे:

श्रीजय अंकूश चांदगुडे,तालुकाध्यक्ष,(कोपरगाव तालुका युवक काँग्रेस),सागर शरद बारहाते(तालुका कार्याध्यक्ष,

कोपरगाव तालुका युवक काँग्रेस),अक्षय मिनानाथ आंग्रे,(शहराध्यक्ष,कोपरगाव शहर युवक काँग्रेस),

गिरीश संपतराव अकोलकर,(कार्याध्यक्ष,कोपरगाव शहर युवक काँग्रेस),जयेश राजेंद्र कदम,(तालुकाध्यक्ष,एनएसयुआय-विद्यार्थी काँग्रेस),अशपाक अब्बास सय्यद, (शहराध्यक्ष, एनएसयुआय-विद्यार्थी काँग्रेस),ऋषिकेश भाऊसाहेब पगारे (शहर कार्याध्यक्ष, एनएसयुआय-विद्यार्थी काँग्रेस),निरंजन लहाणू कुडेकर,(जिल्हा सचिव, एनएसयुआय-विद्यार्थी काँग्रेस) कोपरगावातील नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना सत्यजीत तांबे व तुषार पोटे यांनी शुभेच्छा देऊन भरीव असे काम करण्यासाठी सूचना दिल्या.


--

जाहिरात
Search
विडिओ
Recent News