विस्थापित टपरीधारकांना खोका शॉप बांधुन देण्याचा मागणीची दखल न घेतल्यास कोपरगाव संघर्ष समितीचा उपोषणाचा इशारा !!


विस्थापित टपरीधारकांना खोका शॉप बांधुन देण्याचा मागणीची दखल न घेतल्यास कोपरगाव संघर्ष समितीचा उपोषणाचा इशारा !!

कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारकांना खोका शॉप बांधुन देऊन त्यांचे पुर्नवसन करावे अशी मागणी मागील दहा वर्षापासुन होत असुन आजपर्यंत  नगरपरिषदेने या मागणीची दखल न घेतल्याने दि.२ डिसेंबर २०२० रोजी कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपोषण करण्यात येणार आहे.या आशयाचे निवेदन कोपरगांव व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने कोपरगांव नगरपरिषेदेचे मुख्यधिकारी प्रशांत जी सरोदे साहेब तसेच कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार योगेश जी चंद्रे साहेब आणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन दिले आहे.

तरी सर्व विस्तापित टपरी धारकांनी तसेच सर्व राजकिय नेत्यांनी व नगरसेवक,पदधाकारी समाजसेवक यांनी जन आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि.१०/१/२०११मध्ये कोपरगाव नगरपरीषदेने शहरातील अतिक्रमण काढले होते.त्यामध्ये टपरीधारकांचा समावेश मोठया प्रमाणात होता.त्यावेळी नगरपरीषदे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी फक्त आश्वासनेच दिल्याने विस्थापित टपरीधारकांचे व्यवसाय बंद झाले व देशोधडीला लागले काही जणांचे तर अक्षरशहा : प्रपंच उधवस्त झाले आहे.बरेच व्यवसायिक कोपरगाव सोडुन पोट भरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत व्यवसायाच्या भरवश्यावर बँका व पतसंस्थांची घेतलेले कर्ज स्वःताचे रहाते घर विकुन भरण्याची नामुष्की टपरीधारकांवर आली.काही विस्थापित आजही गावोगावी  भटकंती करुन आपला व कुटुंबाचा उदार निर्वाह करत आहेत.मुलांचे शिक्षण अपूर्ण राहील्याने ती आज बेरोजगार आहेत.तरी या सर्व बाबींचा विचार करून नगरपरीषदेने या मागणीची दखल घ्यावी यासाठी दि.२डिसेंबर २०२० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपोषण करणार आहेत

या निवेदनावर अंकुश वाघ, अकबरभाई शेख, शरद त्रिभुवन शरद खरात, निसार शेख, बालाजी गोर्डे,सागर कानडे, इम्रान मानियार यांच्या सह्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News