कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून नागरिकांनी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करावे –आमदार आशुतोष काळे


कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून  नागरिकांनी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करावे –आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

        आरोग्य विभागाकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मागील काही दिवसांत कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांनी देखील केलेला थोडासा निष्काळजीपणा येणाऱ्या संभाव्य लाटेला पूरक ठरू शकतो. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी  शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलेआहे.

 कोपरगाव तहसील कार्यालयात मंगळवार (दि.२४) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्यविभाग व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात करावयाच्या उपाय योजना व घ्यावयाची काळजी याबाबत आढावा बैठक पार पडली याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच वाढलेलं प्रमाण ऑक्टोबर महिन्यात कमी होवून बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत भीती काहीशी कमी झाल्यामुळे अनेक नागरिक मास्क वापरत नव्हते.  तसेच नुकत्याच पार पडलेल्या दसरा, दिवाळीच्या सणानिमित्ताने अनेक नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी व हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोनाची दुसरी लाट येण्याचा ईशारा दिलेला आहे. देशात काही ठिकाणी दुसरी लाट आली सुद्धा असून कोरोनाचा उद्रेक वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोपरगाव तालुक्यात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर व १६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर मशीन व २बायपॅप मशीन, मॉनिटर,२० के.व्ही.जनरेटर सुविधासह युक्त असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर गंभीर कोविड रुग्णालयासाठी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपल्याकडे यंत्रणा सज्ज आहे. मात्र कोविड अजून संपलेला नाही हे सर्व नागरिकांनी लक्षात घ्यावे. लवकरच लग्नसराई सुरु होत आहे त्यामुळे गर्दी होवून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी असे समारंभ टाळावे. ज्यांच्या घरी लग्न समारंभ आहे त्यांनी आपल्या भावनांना आवर घालून शक्यतो कमीत-कमी व्यक्तींच्या उपस्थितीत समारंभ करावेत. सर्वांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर जावू नये, घराबाहेर जाणे अत्यंत आवश्यक असेल तर मास्क, हँडसॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. लस येणार आहे. लस कधी येणार व येणारी लस किती प्रभावीपणे काम करू शकेल याचे उत्तर आज देणे शक्य नाही. त्यामुळे अजून काही दिवस तरी नागरिकांनी संयम हा पाळलाच पाहिजे व शासनांच्या नियमांचे पालन केले पाहिजे तरच आपण दुसऱ्या लाटेचा यशस्वीपणे मुकाबला करू शकतो. त्यासाठी सर्वांनी आपल्या व आपल्या कुटुंबाचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. यावेळी आरोग्यविभाग व शासकीय विभागाकडून करावयाच्या उपाय योजनांचा आमदार आशुतोष काळे यांनी आढावा घेवून कोरोनाचा संसर्ग वाढू नये याबाबत मार्गदर्शन केले.

 याआढावा बैठकीसाठी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामिण रुग्णालय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. वैशाली बडदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस उपअधीक्षक श्री नागरे, श्री, इंगळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, अरुण चंद्रे, कारभारी आगवन, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गांगुले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, सचिन आव्हाड, रोहिदास होन, प्रशांत वाबळे, आदी उपस्थित होते.

- कोपरगाव तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात व कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारी पूर्वतयारी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे समवेत तहसीलदार योगेश चंद्रे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News