चांदेकसारे ग्रामपंचायतीचे वतीने गावात जंतुनाशके फवारणी !!


चांदेकसारे ग्रामपंचायतीचे वतीने गावात जंतुनाशके फवारणी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव - चांदेकसारे ग्रामपंचायतीने कोरोना वाढत्या संसर्गाचा पाश्र्वभुमीवर संपुर्ण गावात जंतुनाशकांची फवारणी केल्याची माहिती उपसरपंच विजय होन यांनी दिली.

गावातील न्युइंग्लिश स्कुल, प्राथमिक शाळा, सर्व अंगणवाड्या तसेच उर्दु शाळा व गावात जंतुनाशकांची फवारणी केली. मागील काही दिवसात कोरोना संसर्गाचे प्रमाणात घट झाल्याचे दिसत होते परंतु दिवाळी सणानंतर कोरोना संसर्गात वाढ  होत आहे. 

या पाश्र्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन ग्रामपंचायत कमिटीने हा निर्णय घेतल्याचे माजी सरपंच केशवराव होन यांनी यावेळी सांगीतले. मागील सात -आठ महीन्यापासुन कोरोना महामारीने धुमाकुळ घातला आहे.तो रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात आल्या, त्याचा परीणाम म्हणुन मागील काही दिवसात कोरोना बाधीतांच्या आकड्यामध्ये घट झाली होती परंतु सद्य परीस्थितीत आकडा वाढताना दिसत आहे. तरी नागरीकांनी घाबरून न जाउ नये. सोशल डिस्टिंगशनचे नियम पाळावे तसेच मास्कचा नियमीत वापर करण्याचे आवाहन केशवराव होन यांनी यावेळी केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News