दौलतराव जाधव यांची कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती !!


दौलतराव जाधव यांची कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

वर्तमान श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले दौलतराव जाधव यांची कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे दि. २३ नोव्हेबर२०२० रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापन मंडळाची बैठक पार पडली असुन या बैठकीत हा निर्णय झाला.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व तालुका पोलीस  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांची बदली झाल्यानंतर दोनही जागा रिक्त झाल्या होत्या त्यानुसार दौलतराव जाधव यांची तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणुक करण्यात आली आहे.

  दौलतराव जाधव यांनी या अगोदर शिर्डी शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलिस निरीक्षक पदावर काम केले आहे .तर या अगोदर ते कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये मध्येही पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत होते त्यामुळे कोपरगाव तालुक्याचे त्यांनी जवळुन अवलोक़न केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News