दौंड शहरात 173 शिक्षकांच्या RTPCR तपासणी 5 जण पॉझिटिव्ह, तर 68 नागरिकांचे अँटीजेन तपासणीत 7 जण पॉझिटिव्ह


दौंड शहरात 173 शिक्षकांच्या RTPCR तपासणी 5 जण पॉझिटिव्ह, तर 68 नागरिकांचे अँटीजेन तपासणीत 7 जण पॉझिटिव्ह

विठ्ठल  होले विशेष प्रतिनिधी :

 दौंड शहरात 22/11/20 रोजी 173 शिक्षकांच्या  घस्यातील द्रव  (RTPCR)तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये 5 शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत तर 168 जण निगेटिव्ह आल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय येथे सर्व शिक्षकांच्या घस्यातील द्रव तपासणी घेण्यात आली होती उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य सेवक, सेविका डॉ मिलिंद कांबळे,खेडकर,मोमीन शेख व इतर कर्मचारी यांनी दिवस भरात 173 शिक्षकांचे स्वाब घेतले होते त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत,

तर आज दिनांक 23/11/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 68 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 61 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये

महिला-- 3,पुरूष --4 प्रभाग -

दौंड शहर=4,Srpf --3,हे सर्व व्यकटु 9 वर्ष 56 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती दिली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे, कोरोना पुन्हा सुरू होत आहे, मास्कचा वापर करा,सामाजिक अंतर पाळा, गर्दीत जाणे टाळा असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News