महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन च्या वतीने शिर्डी येथे नवनियुक्त पदाधिकारी व कोविड योद्ध्यांचा सन्मान


महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन च्या वतीने शिर्डी येथे नवनियुक्त पदाधिकारी व कोविड योद्ध्यांचा सन्मान

शिर्डी, राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी: महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन अध्यक्ष रवि भाऊ वैद्य, प्रदेशाध्यक्ष विकास सुसर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिर्डी शाखेच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान तसेच नगर जिल्हा युवक कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी मराठवाडा संघटक योगेश सुरळकर,राज्य संघटक माणीक निमसे, मराठवाडा अध्यक्ष उद्योग आघाडी दत्तात्रय धोकटे, युवक राज्य संघटक प्रा. रवि अंभोरे, युवती जिल्हाअध्यक्षा कु. किरण जाधव,कोपरगाव तालुका अध्यक्ष बाळु साळुंके, राज्य कार्यकारणी सदस्य नानासाहेब शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये युवक जिल्हा अध्यक्ष मयुर साळवे तालुका अध्यक्ष प्रविण आल्हाट तालुका उपाध्यक्ष रमेश पाखरे तालुका सचिव रमेश रोकडे तालुका संघटक विशाल बनसोडे तालुका उपसंघटक गौतम शेजवळ तालुका कार्यअध्यक्ष तनविर शेख तालुका उपकार्याध्यक्ष शुभम जमधडे सोशल मिडीया प्रमुख शिवाजी धनवटे सोशल मिडीया उप प्रमुख शिवाजी जाधव तालुका प्रसिध्दीप्रमुख दिपक अंबिलढगे तालुका उपप्रसिध्दी प्रमुख पंकज सेलार शिर्डी शहर अध्यक्ष रमेश कसबे शिर्डी शहर उपाध्यक्ष कृष्णा पवार यांच्या निवडी करण्यात आल्या.

संघटनेचे अध्यक्ष रवि भाऊ वैद्य यानीं संघटनेची नियमावली व पोलीस, पोलीस कुटुंब व सामान्य जनतेला न्याय कसा मिळवुन देता येईल या विषयी थोडक्यात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कसबे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रवि अंभोरे यानीं केले.

या वेळी परीसरातील भरपुर प्रमाणात महिला पुरुष युवक - युवती उपस्थित होते. तसेच पोलीस बॉईज असोसिएशन च्या वतीने अपंगाना मोफत प्रवासासाठी रीक्षाचे अनावरन करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News