देवळाली प्रवरा, विजय भोसले प्रतिनिधी
राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी कुणाल संजय पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते कुणाल पाटील यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव व श्रीरामपुर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे,अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर,अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे,अहमदनगर जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा,युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले आदी उपस्थित होते.कुणाल पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.