डाऊच खुर्द गावची सुकन्या अॅड कावेरी गुरसळ(पवार) यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल संघटक व दौंड रेल्वे स्टेशन कायदेशीर सल्लागारपदी निवड !!


डाऊच खुर्द गावची सुकन्या अॅड कावेरी गुरसळ(पवार) यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल संघटक व दौंड रेल्वे स्टेशन कायदेशीर सल्लागारपदी निवड !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव -डाऊच खुर्द गावची कन्या व वाजुळपोही गावची सुन अॅड सौ. कावेरी गुरसळ (पवार ) यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या लीगल सेल च्या संघटक तसेच सोलापूर डिव्हिजन दौंड रेल्वे स्टेशन येथे कायदेशीर सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल डाऊच येथे सत्कार करण्यात आला. 

सदर प्रसंगी दुर्गामहिला बचतगटाच्या सचीव सौ सुमन गुरसळ कु.अनन्या गरुड व सौ शिंदुताई गुरसळ यांनी अॅड सौ.कावेरी गुरसळ यांचा शाल   श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तर सखी महिला बचत गटाच्या सचीव सौ.मंगल गुरसळ व सौ भारती गरुड यांनी साडी देऊन सत्कार  केला.सदर प्रसंगी अॅड.कावेरी गुरसळ यांचे वडिल श्री आप्पासाहेब गुरसळ व आई सौ.वृंदावनीताई गुरसळ यांचा ही सत्कार डाऊचखुर्द ग्रामपंचायतचे सदश्य श्री शंकरराव गुरसळ यांनी केला.या कार्यक्रमास जेष्ट नागरिक श्री नानासाहेब गुरसळ,श्री दौलत तात्या गुरसळ ,आनाभाऊ पुंगळ ,मधुकर वामनराव गुरसळ,श्री किशोर गुरसळ ,मधुकर गुरसळ,रावसाहेब गुरसळ आबासाहेब गुरसळ, शेखर गुरसळ, सागर गुरसळ ,यशवंत गुरसळ ,यश गुरसळ,कार्यक्रमास उपस्थीत होते सदर प्रसंगीअॅड कावेरी यांनी मुलींना शिक्षणात समाजाकडुन होणार अडचणीबद्दल माहीती दिली.व८ यांनी पदावर पोहचण्यासाठी केलेल्या परीश्रमाबद्दल माहीती दिली तर शंकरराव गुरसळ यांनी डाउचखुर्द गावच्या कन्येने डाऊचखुर्द गावाच्या शिरपेचात  मानाचा तुरा खोवला असे गौरवोद्गगार काढले  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री भास्कर गुरसळ यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News