सावळिविहीर येथे वीज बिलांची भाजपा कार्यकर्त्यांकडून होळी!


सावळिविहीर येथे वीज बिलांची भाजपा कार्यकर्त्यांकडून होळी!

शिर्डी (प्रतिनिधी) कोरोना या महामारीमुळे सर्व जग हादरले असून जीवन कसे जगावे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे,बेरोजगारी, महागाई याने जनतेचे कंबरडे मोडले आहे,जगाव की मरावं हा मोठा प्रश्न आहे त्यात
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी वाढीव वीज बिले  देऊन त्यात आणखीन भर टाकत आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावळीविहीर येथे या वाढीव वीज बिलांची आज सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी बाजारतळा मध्ये भाजपा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व ग्राहकांच्या साक्षीने होळी करण्यात आली, यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जनार्धन जपे तसेच राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थित ही होळी करण्यात आली ,यावेळी बाळासाहेब जनार्धन जपे व पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव यांनी की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कोरोणाच्या काळामुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत व अशा आर्थिक संकट काळातच महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने आपल्या ग्राहकांना वाढीव वीज बिले देण्याचे सुरुवात केली असून त्याची वसूलही  सक्तीने करण्यात येत आहे ,त्यामुळे  येथील नागरिक,वीज ग्राहक आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडत आहे, त्यामुळे या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या या धोरणाचा भाजपा तर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन येथेही आज वीज बिलांची होळी करण्यात येत असल्याचे बाळासाहेब जपे व ओमेश जपे यांनी सांगितले, त्याच प्रमाणे वाढीव वीज बिले हे  कोणत्याही शेतकऱ्यांनी भरू नये हे असे आवाहन यावेळी प्रगतशील शेतकरी नवनाथ पाटील जपे यांनी वीज ग्राहकांना व शेतकऱ्यांना आवाहान केले, यावेळी सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच ,उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते गणेश आगलावे, मातेरे,सचिन भेरवकर,रावसाहेब येखंडे,विजय भोसले, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक दुरीचे अंतर व मास्क वापरून हे विज बिल होळी आंदोलन करण्यात आले,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News