संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव येथील शिव जागर फऊंडेशनच्या वतीने कोपरगाव शहरातील कानाकोपऱ्यातील न दिव्यांग व गरीब लोकांना थंडीपासुन बचाव करण्यासाठी शिवजागार फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सुपेकर यांच्या संकल्पनेतुन स्वेटर व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.
प्रथम शिवस्मारक येथे शिव सुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर वक्ते यांचा हस्ते महाआरती घेऊन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली यावेळी शिवजागर फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सुपेकर,परेश सोनवणे तसेच शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुधाकर वक्ते, प्रदीप गायकवाड, अतिश शिंदे,अरुण सुपेकर,आशिष शिंदे,संतोष जाधव, मयूर चव्हाण, राहुल तळेकर,शुभम गवारे,प्रीतम सोनवणे,अनिकेत सताळे,किरण चव्हाण,विजू वक्ते,सुमित पगारे खडू गांगुडे,साईनाथ वायकर
आदी शिवभक्त मोठया प्रमाणात उपस्थितीत होते..