कोपरगाव बस स्थानकाचे छ शिवाजी महाराज टर्मिनस नामकरण करावे !!


कोपरगाव बस स्थानकाचे छ शिवाजी महाराज टर्मिनस नामकरण करावे !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

शिव प्रेमी संघटना व नागरिकांची मागणी !

कोपरगाव शहरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या बस स्थानकास छ शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी कोपरगाव येथील शिवप्रेमी संघटनांनी केली आहे

विविध संघटनांच्या वतीने आज या आशयाचे निवेदन कोपरगाव येथील नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आले असून या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या कोपरगाव बस स्थानकाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे बस स्थानक असून कोपरगाव बस आगारातून पुणे, मुंबई,औरंगाबाद, धुळे आदी महत्वाच्या जिल्ह्यात बस सेवा सुरू असते सर्वात महत्वाचे म्हणजे जागतिक दर्जाचे शिर्डी देवस्थान हे कोपरगाव जवळ आहे त्याच प्रमाणे शिर्डी बस स्थानकाचा सर्व कारभार कोपरगाव बस आगारचा नियंत्रणा खाली सुरू असतो

कोपरगाव येथील बस आगाराच्या या भव्य दिव्य इमारतीस महाराष्ट्राचे थोर युगपुरुष छ शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे  तसेच या इमारतीस छ शिवाजी महाराज यांचे नाव दिल्यास परिवहन विभागाच्या बहुजन सुखाय बहुजन हिताय  या युक्ती प्रमाणे छ शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली व त्या मावळ्यांनी योगदान दिले  त्यामुळे या बस स्थानकाला छ शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव द्यावे अशी मागणी केली असून या निवेदनावर अँड.नितीन पोळ , शिव भक्त स्वप्नील हगवणे पाटील, समाजसेवक अर्जुन मोरे, राजू मगर, कृष्णा निकम,तुषार  कोकाटे,सुनील धनवटे आदींच्या सह्या आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News