जनकल्याण समिती तर्फे ३०० महिलांना साडी व फराळ भेट देऊन दिवाळी भाऊबीज साजरी


जनकल्याण समिती तर्फे ३०० महिलांना साडी व फराळ भेट देऊन दिवाळी भाऊबीज साजरी

जनकल्याण समिती नगर तर्फे दिवाळी भाऊबीज कार्यक्रमात महिलांना साडी व फराळ भेट देताना आरोग्य आयाम प्रमुख राजेश परदेशी,संघाचे शहर कार्यवाह हिराकांत रामदासी,डॉ.विलास मढीकर आदी.(छाया-अमोल भांबरकर)      

नगर (प्रतिनिधी संजय सावंत -) भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन व्हावे.व सर्वाना याची माहिती व्हावी या उद्देशाने रा.स्व.संघ जनकल्याण समिती नगर तर्फे समाजातील वंचीत महिलांसाठी दिवाळी भाऊबीज हा कार्यक्रम बारा वर्षांपासून साजरा केला जातो.हा कार्यक्रम जिल्ह्यातील बोल्हेगाव, संजयनगर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, कोरडगाव,पाथर्डी येथील निपाणी जळगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात ३०० वंचीत महिला भगिनींना भाऊबीज साडी,तेल,साबण व फराळ भेट देण्यात आले.                            

 तसेच दिवाळी सणाची सुरुवात वसू बारसनिमित्त होते.या दिवशी गाय वासराचे पूजन करतात.आजकाल जलद जीवनशैलीत गाय वासरू कुठे शोधायचे व त्यांची पूजा कशी करायची ?असा प्रश्न शहरातील महिलांना पडतो.हे जाणून घेऊन जनकल्याण समितीने वसू बारसेच्या दिवशी सावेडी उपनगरात ५ ठिकाणी गाय व वासरू आणून ठेवले.व महिलांनी  त्यांची पूजा करून दिवाळीची  सुरुवात केली.हा उपक्रम मागील तीन वर्षापासून राबविला जात आहे.दिवाळी भाऊबीज हा कार्यक्रम विश्वहिंदूपरिषद व धर्मजागरण यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व ठिकाणी राबविण्यात आला.या दोन्ही कार्यक्रमासाठी रा.स्व.संघ जनकल्याण समिती नगरचे अध्यक्ष अँड.सुधीर झरकर,उपाध्यक्ष अभय मिस्त्री,कार्यवाह डॉ.मनोहर देशपांडे,आरोग्य आयाम प्रमुख राजेश परदेशी,संस्कार आयाम प्रमुख बिनीवाले,शहर कार्यवाह हिराकांत रामदासी,डॉ.विलास मढीकर,महादेव कोकाटे,जयश्री भोसले,मंगल भिंगारदिवे,जरंडकर,राहुल गांधी विशेष परिश्रम घेतले.दिवाळी भाऊबीज कार्यक्रमासाठी ज्यांनी देणगी दिली त्या सर्व देणगीदारांचे आभार जनकल्याण समितीच्या वतीने मानण्यात आले.                            

-       

जाहिरात
Search
विडिओ
Recent News