प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारिवाल, डाॅ.तुषार पाटील, डाॅ.अखिलेश राजुरकर यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन गौरव


प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारिवाल, डाॅ.तुषार पाटील,  डाॅ.अखिलेश राजुरकर यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन गौरव

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

            शिरूर शहर शिवसेनेच्यावतीने येथील शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारिवाल, व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व श्री गणेशा हाॅस्पिटलचे डाॅ.अखिलेश राजुरकर यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

          यावेळी नगरसेवक व शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख,स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार,नगरसेवक अभिजीत पाचर्णे,शहर प्रमुख मयुर थोरात उपस्थित होते.

          कोरोना संसर्ग सुरू झाल्याने लाॅडडाऊनमध्ये शिरूर शहराच्या पुणे - नगर या बाह्यमहामार्गावरून पायी जाणा-या प्रवाशांना,स्थलांतरीतांना,मजुरांना तसेच गोरगरीबांना अन्नछत्र सुरू करून जेवन दिले या कार्याची दखल घेऊन प्रसिध्द उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्यासह ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व श्री गणेशा हाॅस्पिटलचे डाॅ.अखिलेश राजुरकर यांनी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासुन रूग्णांना चांगली सेवा दिली असल्याबद्दल शहर शिवसेनेच्यावतीने त्यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News