मुकुंद मामा काळे यांनी दिला 80 वर्षांच्या निराधार दिव्यांग आजीला आजीवन पोट पाण्यासाठी आधार !!


मुकुंद मामा काळे यांनी दिला 80 वर्षांच्या निराधार दिव्यांग आजीला आजीवन पोट पाण्यासाठी आधार  !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथील 80 वर्षीय दिव्यांग निराधार आजी भिमबाई दौलत बर्डे यांना आजीवन मोफत दोन वेळच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मुकुंद मामा काळे व सामाजिक कार्यकर्ते संदीप कोद्रे यांनी हा सामाजिक बांधिलकी जपनारा उपक्रम राबविला आहे. बर्डे या 80 वर्षीय दिव्यांग आजी या निराधार आहेत.त्यांचे दोनही पाय निकामी झाल्याने त्यांना चालता येत नाही आपल्या टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी त्या गावामध्ये फरफटत दोरोदार फिरुन भाकरी मागत फिरत होत्या.ही बाब माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे व कोल्हे कुटुंबाच्या सामाजिक कार्याची प्रेरना घेऊन काम करनारे मुकुंद मामा काळे यांच्या निदर्शनास आली.त्यांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते संदीप चंद्रकांत कोद्रे यांच्या निदर्शनास आनुन दिली.त्यानुसार कोद्रे यांनी या आजीची परिस्थिती बघितली असता त्यांनी तत्काळ या निराधार दिव्यांग महिलेस मदत करण्याचे ठरविले.त्यानुसार या दिव्यांग निराधार आजीच्या दोन वेळच्या जेवनाची व चहाची सोय करण्यासाठी गावातीलच सुमन गोरे या महिलेला आजीवन स्वखर्चाने दरमहा बाराशे रुपये देण्याचा निर्णय घेऊन सोय करुन दीली आहे.त्यामुळे या आजीची गेल्या अनेक वर्षाची फरफट थांबली आहे.दिवाळीनिमित्त या आजीला छायाताई मुकुंदमामा काळे यांच्या हस्ते साडीदेखील भेट म्हणुन दिली आहे.याप्रसंगी छायाताई काळे,श्री संत सावता माळी युवक संघाचे तालुका अध्यक्ष अशोक माळवदे,श्री शनैश्वर महाराज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गोरक्षनाथ टुपके,सदस्य रमेश पिंपळे,गोरख टुपके,सुमन गोरे,विलास टुपके,शरद भवर,रामदास टुपके,अमोल पिंपळे उपस्थित होते.

या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे महात्मा फुले मंडळ अध्यक्ष प्रदीपजी नवळे,कोपरगाव नगरपालिका नगरसेवक वैभवजी गिरमे व श्री संत सावता माळी युवक संघ कोपरगाव तालुका पदाधिकारी शेखर बोरावके,संतोष रांधव,डाॅ.मनोज भुजबळ,योगेश ससाणे,संदीप डोखे,मनोज चोपडे,देवेश माळवदे,अनंत वाकचौरे,तुषार ससाणे,सुनिल मंडलिक व सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News