योगेश ढगे यांना फुले एज्युकेशन चा पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर पाठींबा


योगेश ढगे यांना फुले एज्युकेशन चा पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर पाठींबा

विठ्ठल होलै  विशेष प्रतिनिधी: पुणे---पुणे पदवीधर अपक्ष उमेदवार सारथी असो.चे अध्यक्ष मा.योगेश ढगे यांनी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राला भेट देऊन सुरवातीला  ढगे यांचे हस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले  आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार  अर्पण करण्यात आला.

या नंतर रघुनाथ ढोक यांनी संस्थेच्या वतीने स्वागत करून त्यांना पदवीधर मतदारसंघ उमेदवारी  साठी जाहीर पाठींबा देऊन मागासवर्गीय विध्यार्थ्यांना वेळेत ज्या त्या वर्षीच scholarship मिळावी तसेच बाहेरून शहरात शिकण्यासाठी मुले येतात त्यां सर्वानाच हॉस्टेल निर्वाह भत्ता मिळावा तसेच पदवीधर मुलांसाठी सरकारी नोकऱ्या जास्तीतजास्त उपलब्ध होऊन भरती पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न करावे.तसेच फुले शाहू आंबेडकर यांच्या कृतिशील कार्याचा ,विचाराचा  व सत्याच्या मार्गाने काम करण्याचा मौलिक सल्ला देऊन शुभाशीर्वाद दिला.

यावेळी पदवी उमेदवार योगेश ढगे म्हणाले की मी महापुरुषांचे विचारानेच काम करून विध्यार्थ्यांनच्या हिताचे दृष्टीने कायम काम करेल तसेच ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या व संस्थेच्या पाठीशी उभा राहील आणि विधवा महिलांनच्या मुलांना  सम्पूर्ण मोफत शिक्षण आणि उच्चशिक्षिण घेताना राखीव जागा मिळावेत तसेच कोणताही रोजनदारी कष्टकरी  याला महाराष्ट्र शासनाचे अधिकृत ओळख पत्र त्यांना आरोग्य विमा ,55 वयानंतर हक्काची पेन्शन व सामाजिक सुरक्षा मिळेल यासाठी सम्पूर्ण शक्ती पणाला लावून फहक्त समाज हिताचे कार्य करणार याची ढगे यांनी निवडून आलेनंतर हमी दिली.पुढे असे ही म्हणाले की या पैकी माझे कडून एकही काम न झाल्यास एक वर्षात राजीनामा देईन याची खात्री देतो तरी मला पदवीधरानी एक वेळ चांगले काम करण्याची व आपणा सर्वांचे सेवा करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.शेवटी आभार समाधान खांडेकर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News