मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत समता परिषदेसह ओबीसी संघटनांचा विरोध नाही !! पदमाकांत कुदळे


मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत समता परिषदेसह ओबीसी संघटनांचा विरोध नाही !! पदमाकांत कुदळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

ओ.बी.सी.च्या हक्कासाठी कोपरगांवला २७ नोव्हेंबरला मोर्चा !

कोपरगांव -  ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत समता परिषदेसह ओबीसीच्या कोणत्याही संघटनांचा विरोध नसून फक्त शासनाने ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करुन अखिल भारतीय समता परिषदेचे प्रांतिक सदस्य ज्येष्ठ नेते पदमाकांत कुदळे यांनी केली.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचविण्यासंदर्भात शिर्डी येथे समता परिषदेचे प्रांतिक सदस्य पदमाकांत कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत कुदळे बोलत होते.

यावेळी विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, ग्लोबल कहार समाजाचे प्रदेशध्यक्ष अशोक लकारे, जिल्हा महिलाध्यक्ष हर्षदा बोरावके, समता परिषदेचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस मनिष जाधव, जिल्हा कार्यकारणी सदस्य डाॅ. मनोज भुजबळ, जिल्हा संघटक बाळासाहेब ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

ओ.बी.सी. च्या हक्कासाठी सर्व समाज एकत्र आहोत याची प्रचीती शिर्डी येथे झालेल्या बैठकीमध्ये पाहण्यास मिळाली. सर्व क्षेत्रातील तोलामोलाचे व्यक्तिमत्व कुठलाही पक्ष व संघटनेच्या भेद न करता बैठकीत एकत्रितरित्या सहभागी झाले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी ओबीसी आरक्षण या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

पदमाकांत कुदळे बोलतांना म्हणाले की,आरक्षणाच्या प्रश्नावर निर्माण झालेल्या पेच प्रसंगाला सामोरे जात असताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे प्रथमतः स्पष्ट करुन कुदळे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाला समता परिषदेचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आपली भूमिका असून ओबीसी बांधवांची भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी कोपरगांवला २७ नोव्हेंबरला मोर्चा काढून निवेदने सादर करण्यात येणार असल्याचे कुदळे यांनी जाहिर केले.  

यावेळी विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड म्हणाले की, देशात महात्मा फुले यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देण्याची भूमिका पार पाडली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या माध्यमातून आरक्षण मिळाले आहे. देशात ओबीसींची संख्या ५२ टक्के आहे. त्यामुळे ज्याची जेवढी संख्या तेवढं आरक्षण देण्याची गरज असतांना केवळ १९ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. त्यातही प्रत्यक्षात ३४० जातींना आता १७ टक्के आरक्षण मिळत असून त्यात हा ५२ टक्के समाज बसविला जात आहे असे असतांना ओबीसीं आरक्षणातून मराठा आरक्षण देण्याची मागणी काही लोक करत आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कुणाचाही दुजाभाव नाही. मराठा समाजाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत आरक्षण देण्यात यावं मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये. तसेच ओबीसी जनगणना करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी केंद्राकडे मागणी केली. मात्र आजवर ओबीसी आकडेवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे नवीन जनगणनेत ओबीसीं समाजाची जनगणना करण्यात यावी अशी मागणी करत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी यासाठी १ लाख २ हजार २१ पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. जोपर्यंत ओबीसी जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसींना आपल्या हक्काचे मिळणार नाही. यासाठी ओबीसीं बांधवाना एकत्र आणुन बहुजन समाजात मोठ्या भावाची भूमिका पार पडणार्या सर्व बांधवाना एकत्र करावे असे आवाहन मच्छिंद्र गुलदगड यांनी यावेळी केले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक भाउसाहेब मंडलीक, श्रीमरापुर समता परिषदेचे चंद्रकांत झुरंगे, महात्मा फुले मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्र चैधरी, कोपरगांव समता परिषदेचे शहरध्यक्ष विशाल राऊत, राहुरी शहरध्यक्ष किशोर राऊत, प्रकाश कु-हे, नगरसेवक प्रमोद मंडलीक, अरुण ताजणे, भगवाण टिळेकर, संतोष लोंढे, भाऊसाहेब वाघमारे, मलिंद बनकर, छल्लानी आदि ओबीसी संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News