२३नोव्हेंबरला कोपरगावात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली विज बिलांची होळी आंदोलन !!


२३नोव्हेंबरला कोपरगावात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली विज बिलांची होळी आंदोलन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

विज बिलात सवलत देण्याची कोपरगाव भाजपा ची मागणी !

कोपरगाव -लाॅकडाउनमुळे आर्थीक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठया वीज बिलांचा शॉक दिला. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते, परंतु या सरकारच्याच उर्जामंत्री यांनी वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही, ती नागरीकांना भरावी लागतील, असे स्वतः उर्जामंत्री यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी 23 नोहेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर वीजबिलांची होळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम आणि शहराध्यक्ष दत्ता काले यांनी सांगितले.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउनची परिस्थिती असल्याने सध्या राज्यातील जनता मोठया प्रमाणात आर्थिक तणावाखाली आहे. या परिस्थितीत वीजवितरण कंपनीने भरमसाठ बिले दिली, त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला असतांना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी वीजबिलात सवलत देण्याचे जाहीर केले होते, परंतु आघाडी सरकारमधील उर्जामंत्री यांनी नागरीकांना वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही असे सांगितल्याने हे सरकार फसवे सरकार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या भरमसाठ विजबिलांबाबत जनतेला रास्त सवलत दयावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर वीज बिलांची होळी आंदोलन करण्यात  येणार आहे.  कोपरगाव येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने  २३ नोव्हेंबर २० रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात येणार असल्याने नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोहोम व काले यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News