आई-वडीलानंतर मार्ग दाखविणारा गुरु म्हणजे शिक्षकच- आ.राधाकृष्ण विखे


आई-वडीलानंतर मार्ग दाखविणारा गुरु म्हणजे शिक्षकच- आ.राधाकृष्ण विखे

राहूरी फॅक्टरी, महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

बालवयात आई वडिलांच्या संस्कारानंतर विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम शिक्षक करत असतो तेच प्रामाणिक काम क्रीडाशिक्षक शशिकांत म्हस्के यांनी करून अनेक विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी रहावी यासाठी मोठी धडपड केली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.

  राहूरी तालुक्यातील रामपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शशिकांत म्हस्के यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा माजी मंत्री  आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडला.प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, प्रवरा कारखान्याचे संचालक संजय आहेर, चंद्रकांत म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलताना  आ.विखे म्हणाले की,शशिकांत म्हस्के सरांचे काम पाहिले की स्व. म्हस्के मास्तरांची आठवण कायम येते.विद्यार्थी घडवत असताना आई वडीलानंतर,शिक्षक हा खरा मार्ग दाखवत असतो.

अलीकडच्या काळात शारीरिक आरोग्य हे महत्त्वाचे बनले असून म्हस्के सरांनी क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी  राहण्यासाठी मोठी धडपड केली असल्याचे ते म्हणाले.

  या कार्यक्रमास मार्तंडराव बुचुडे सर, चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, चैतन्य अँक्वाचे संदीप भांड ,माधवराव भोसले,चंद्रभान म्हस्के, विजय आहेर, पंडित सर,दळवी सर, साळुंके सर ,सौ छाया म्हस्के ,बाळासाहेब घोलप, सुरज म्हस्के, निलेश म्हस्के, निलेश कराळे , सौरभ घोलप तसेच प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News