श्री साई संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली करून संस्थानने जाहीर केलेला बोनस कर्मचा-यांना त्वरीत वाटप करावा शिवसेनेचे रावसाहेब खेवरे व विजयराव काळे यांची मागणी!


श्री साई संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली करून संस्थानने जाहीर केलेला बोनस कर्मचा-यांना त्वरीत वाटप करावा शिवसेनेचे  रावसाहेब खेवरे व विजयराव काळे यांची मागणी!

शिर्डी, राजेंद्र दूनबळे,( प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हे अकार्यक्षम अधिकारी असून यांची बदली झालेली असतानाही ते येथेच आहे, त्यांचे बदलीच्या ठिकाणी त्यांनी त्वरित पदभार स्वीकारावा म्हणून शासनाने त्यांना आदेश करावेत अशी मागणी करत साईबाबा संस्थांननी संस्थान कर्मचाऱ्यांचा जाहीर केलेलादिवाळी बोनस त्वरित वाटप करावा ,अशी मागणी  शिवसेनेचे जिल्हा प्रमुख,रावसाहेब खेवरे, विजयराव काळे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे, मुख्यमंत्र्यांना  पाठवलेल्या पत्रकात विजय काळे यांनी म्हटले आहे की ,श्री कान्हुराज बगाटे यांची शिर्डी हुन मुंबईला बदली झाली आहे ,मात्र ते संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनच येथे अजूनही कार्यरत आहेत, तेव्हा शासनाने त्यांना बदलीच्या ठिकाणी त्वरित हजर होण्याचे आदेश करावेत व शिर्डी श्री साईबाबा संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्वरित नव्याने आलेले त्यांना पदभार स्वीकारण्यास सांगावे अशी मागणी करत शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांचा जाहीर केलेला दिवाळी बोनस वाटप करावा ,अशी मागणी ही विजय काळे यांनी या पत्रकात केली आहे व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना त्यांनी हे निवेदन पाठवले आहे, या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे ,विजय काळे ,नानासाहेब बावके, जिल्हा महिला आघाडीच्या अनिताताई  जगताप, विजयराव जगताप  तालुकाध्यक्ष संजय शिंदे सचिन कोते सुनिल परदेशी सौ स्वाती परदेशी आदींची नावे व पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. श्री साई संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली करून संस्थानने जाहीर केलेला बोनस कर्मचा-यांना त्वरीत वाटप करावा विजय काळे यांची मागणी!

जाहिरात
Search
विडिओ
Recent News