माध्यमिक शिक्षक सोसायटीचा उत्कर्ष कायम राहील - माजी आमदार नरेंद्र घुले


माध्यमिक शिक्षक सोसायटीचा उत्कर्ष कायम राहील   - माजी आमदार नरेंद्र घुले

शेवगाव / प्रतिनिधी :सज्जाद पठाण मनुष्य घडविण्याचे काम शिक्षकच करू शकतो. त्यामुळे शिक्षकांची असलेली सोसायटीची वाटचाल प्रगती करणारी आहे.१००टक्के वसुली असणारी संस्था फार कमी आहेत. सहकारी संस्था चालवणे दिवसेंदिवस अधिक जिकीरीचे होत चालले आहे. सहकारात नकारात्मक बाबी दुर सारुन सकारात्मक गोष्टींना प्राधान्य दिले तर संस्थेचा वटवृक्ष उभा राहतो. माध्यमिक सोसायटीने याच तत्वावर काम करत सभासदांची आर्थिक पत वाढवली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डाँ.नरेंद्र घुले यांनी केले.

    शेवगाव येथे अ.नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या शेवगाव शाखेच्या नवीन इमारतीचे उदघाटन माजी आमदार डाँ. नरेंद्र घुले यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी अँड.शिवाजी काकडे, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, रविराज गडाख, अरुण लांडे, बबन पवार, बबन भुसारी, अंबादास कळमकर, राजाजी बुधवंत, भाऊसाहेब चेके, डाँ.विकास बेडके ,अप्पासाहेब शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. 

    माजी आमदार नरेंद्र घुले म्हणाले की, सहकार क्षेत्रात सध्या खुप कमी संस्था सभासदाभिमुख काम करतात. त्यामध्ये या संस्थेचे नाव प्रामुख्याने पुढे येते.या संस्थेची कामगिरी अतिशय चांगली आहे. अनेक नावीन्यपुर्ण उपक्रम राबवत संस्थेने शंभर टक्के वसुली करत एखादया राष्ट्रीयकृत बँकेला ही हेवा वाटेल अशा ठेवी निर्माण केल्या आहेत. चांगली आर्थिक शिस्त असल्याने संस्थेचे तब्बल ११ हजार ५०० सभासद हीच या संस्थेची प्रगती दाखवणारी खरी ओळख आहे. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये शिक्षक सभासदांचा शंभर टक्के आरोग्य विमा संस्थेने उतरवावा. शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभुमीवर सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विदयार्थी, शिक्षक व पालक संसर्गापासून मुक्त राहतील याची काळजी संस्थेने घ्यावी. 

     भाऊसाहेब काकडे म्हणाले की, सहकाराशिवाय व्यक्तीला पत उपलब्ध होत नाही. अडीअडचणीच्या काळात मदतीसाठी सहकारी संस्था नेहमीच धावून येतात. व्यवस्थापनाचे गुण दोष असू शकतात. मात्र दोष कमी करुन पतसंस्था अधिक चांगल्या प्रकारे चालवून संचालक मंडळाने नवीन इमारतीमध्ये सर्वसामान्य सभासदांना अधिक चांगल्या प्रकारे न्याय देवून कारभाराचा आदर्श निर्माण करावा. 

  जेष्ठ संचालक भाऊसाहेब  कचरे म्हणाले की,दिवाळी दरम्यान अनेक अडचणी वर मात करून सर्व सभासदांना लाभांश दिला आहे.अनेक नवनवीन योजना राबविल्या जातील.कर्जावरील व्याजदर कमी करुनही कर्ज मर्यादा वाढवणारी ही एकमेव पतसंस्था असून भविष्यात व्याजदरात कपात करुन सभासदांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. 

या कार्यक्रमात माजी संचालक आझाद इनामदार,अशोक नवल तसेच सर्व विद्यमान संचालक तसेच सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब घुले यांनी तर सुत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर संचालक सत्यवान थोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करीता राजेंद्र पानगव्हाणे,सिंकदर शेख,अमृत गोरे,सुरेश विधाते,नवनाथ कुसळकर,दत्तात्रय पवार ,शाखाधिकारी सुनिल सुडके व सर्व कर्मचारी आदींनी प्रयत्न केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News