कोपरगावचे कोरोना योध्दा पोलिस निरीक्षिक अनिल कटके साहेब यांचा कार्याबद्दल थोडक्यात ........ !!


कोपरगावचे कोरोना योध्दा पोलिस निरीक्षिक अनिल कटके साहेब यांचा कार्याबद्दल थोडक्यात ........ !!

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आतापर्यत नियुक्त झालेल्या सर्व कर्तव्यदक्ष व प्रामाणिक आधिकाऱ्याधील एक अग्रगण्य व महत्त्वपुर्ण नाव म्हणजे वर्तमान नियुक्त पोलिस निरीक्षक अनिल कटकेसाहेब ....

   मागिल काही महीन्यांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर कोपरगाव तालूका सुरुवातीच्या काही महीने जिल्हातील इतर तालुक्याच्या तुलनेत कोरोना संसर्गा पासून आलिप्त ठेवण्यास ज्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनतघेतली त्यामध्ये कटके साहेबांचे नाव आवर्जुन घेतले जाते .

कोरोना संकटकाळात कोपरगाव तालूक्याच्या ग्रामिण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेले प्रभावी नियोजन व त्यासाठी कमीत कमी पोलीस दलाचा केलेला उपयोग हा स्तुत्य उपक्रम होय.

  तोंडांत साखर तर डोक्यावर बर्फ ठेवून तसेच वेळेला पोलिसी खाक्या दाखुन कमीत कमी वेळात एखादे प्रकरण तडीस नेण्यात कटकेसाहेबांचा हातखंडा आहे.

सोशल मिडियाचा योग्य वापर करून आपली जबाबदारी अतिशय प्रामाणिक पणे पार पाडणारे पोलिस आधिकारी म्हणुन त्यांचा नावलौकीक आहे.   

तालुक्यातील कुठल्याही भागात अनुचित प्रकार घडण्या अगोदरचे नियोजन करण्याची चाणक्य नीती पोलीस पाटलांना प्रथम ज्यांनी शिकवली ते म्हणजे अनिल कटके साहेब होय. 

 तालूक्यातील गावा- गावात कायदा सुव्यवस्था अबाधित   ठेवण्यास पोलिस पाटिल कसा सज्य तयार राहिल याकरीता वेळो वेळी पोलिस पाटलांना सूचना  आणि मार्गदर्शन करण्यासाठी मासिक मिटींग घेउन लक्षभेद करण्याची ताकद पोलिस पाटलांना साहेबांनी नेहमीच दिली आहे.

अश्या या कर्तव्यदक्ष व खमक्या पोलीस आधिकाऱ्यांना कोरोना योध्दा सन्मान देणे हे त्यांच्या कामाचे कौतुक करणे होय,आणि ते क्रमप्राप्त आहे ......

सहकार्य - पंडीत पवार पोलिस पाटील हिंगणी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News