दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर दौंड मध्ये कोरोना पुन्हा सक्रिय,पहिल्यांदाच 304 जणांची अँटीजेन तपासणी


दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर दौंड मध्ये कोरोना पुन्हा सक्रिय,पहिल्यांदाच 304 जणांची अँटीजेन तपासणी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : दौंड -तालुक्यात कोरोनाची एन्ट्री झालीच आहे,दौंड शहर दोन महिन्यांपासून शांत होते परंतू कोरोना संसर्ग दौंड मध्ये आल्यापासून पहिल्यांदाच तब्बल 304 लोकांची अँटीजेन तपासणी करण्यात आल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, थंडी मुळे कोरोना जलद गतीने फैलावण्याची भीती वाढत आहे, त्यासाठी लग्न,जत्रा यात्रा,अंत्यविधी अशा ठिकाणी गर्दी टाळणे गरजेचे आहे,जनतेने एप्रिल,मे महिन्यात जशी काळजी घेतली तशीच काळजी यापुढेही घ्यावी असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी दौंड च्या जनतेला केले,दिनांक 20/11/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 304 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले पैकी एकूण 11 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 293 व्यक्ती चे report negative आले आहेत

Positive मध्ये महिला-- 2

पुरूष --9,प्रभाग -दौंड शहर=4,ग्रामीण=1

Srpf 7--- 6,हे सर्व जण 12 वर्ष 68 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर सर्वानी शासनाचे नियम पाळले पाहिजेत,मास्क चा वापर केलाच पाहिजे, हात स्वच्छ धुवावे,गर्दीद जाऊ नये आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे ही डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News