दौंड येथील तरुणाने पोलिसांच्या मदतीने रस्ता चुकलेल्या मुलाला केले आईवडिलांच्या स्वाधीन,आईवडिलांनी मानले आभार


दौंड येथील तरुणाने पोलिसांच्या मदतीने रस्ता चुकलेल्या मुलाला केले आईवडिलांच्या स्वाधीन,आईवडिलांनी मानले आभार

विठ्ठल होले  विशेष प्रतिनिधी :

दौंड येथे रस्ता चुकून आलेल्या लहान मुलाला दौंड येथील तरुणाच्या सतर्कतेमुळे आणि दौंड पोलिसांच्या तातपरतेमुळे त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पो हवा संतोष शिंदे यांनी दिली. दौंड येथील तरुण अभिजित तुपसौंदर्य हा पुण्याहून रेल्वेने दौंड ला येत असताना त्याला हा लहान मुलगा घाबरलेल्या स्थितीत दिसला अभिजित याने त्या मुलाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे त्याला संशय आला म्हणून त्याने मुलास दौंड पोलीस स्टेशन येथे आणले त्यावेळी कर्तव्यावर असणारे सहायक फौजदार संतोष शिंदे,पो हवा विठ्ठल गायकवाड,पो हवा चव्हाण यांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने अभिषेक पांडुरंग दगडे राहणार जेजुरी असे सांगितले,त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन येथे ड्युटीवर असणारे पो हवा  इराण्णा मुत्तनवार यांना फोन करून सदर मुलाचे नाव व फोटो पाठवून चौकशी करण्यास सांगितले असता तो मुलगा जेजुरी येथील असल्याचे समजले,त्याच्या आईवडिलांना सहा फौजदार शिंदे यांचा मोबाईल नंबर देऊन संपर्क करण्यास सांगून दौंड पोलिस स्टेशन येथे बोलावून घेण्यात आले, त्यांची ओळख पटवून त्या मुलास त्यांच्या ताब्यात देण्यात आले, त्यावेळी त्या मुलाला विचारले तू इकडे कसा आलास तेव्हा त्याने सांगितले की सकाळी जेजुरी रेल्वे स्टेशन वरून रेल्वेने पुण्याला आलो तेथे दिवसभर थांबून संध्याकाळी पुन्हा गाडीत बसलो गाडी कुठे चालली मला कळले नाही, मला वाटले परत जेजुरीला जाईल असे सांगितले,परंतू अभिजित तुपसौंदर्य याच्या सतर्कतेमुळे आणि दौंड पोलिसांच्या तातपरतेमुळे तो लहान मुलगा पुन्हा आईवडिलांकडे सुखरूप पोहचला,जाताना त्याच्या आईवडिलांनी सर्वांचे सआश्रू नयनांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News