ॲड.गौरव गुरसळ यांनी अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त कुटुंबांची दिवाळी केली गोड !!


ॲड.गौरव गुरसळ यांनी अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त कुटुंबांची दिवाळी केली गोड !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव नजिक मुर्शतपुर येथील मंडपी परीसरात मागील काही महीन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी याकरीता मुर्शतपुर येथीलॲड गौरवजी गुरसळ यांचे कुटुंबाने साड्या व मिठाईचे वाटप केले.

कोविड १९ संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लागु केलेल्या टाळेबंदीमुळे शेतकरी वर्ग,व्यावसायिक मजुरवर्गाने अत्यंत हालाखिचे दिवस काढले. हाताला कामधंदा तसेच माला भाव नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला या संकटातुन बाहेर निघण्याचा मार्ग शोधत असताना नैसर्गिक आपत्ती नावाचे दुसरे संकट उभे ठाकले,

या मोसमात संपूर्ण कोपरगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले हंगामातील उभी पिके आडवी झाली शेतात पाणी साचल्याने शेत मजुरांचे हाताला काम नाही त्यातच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कधी नव्हे येवढी घट झाली. त्यानंतर आलेल्या दिवाळीचा सण कसाबसा साजरा करण्यात आला

  यावेळी कोपरगाव वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.गौरवजी गुरसळ साहेब यांनी आपल्या परीवारा समवेत मंडपी येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटूंबाला भेट देऊन व दिपावली निमित्त महिलानां साड्या,मिठाई व मुलांना चाॅकलेट वाटले ..

यावेळी अँड.गौरवजी गुरसळ, सारिका गुरसळ,अजिंक्य गुरसळ  अनिरुद्ध गुरसळ व दादासाहेब गुरसळ तसेच गावातील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी गावकऱ्यांना गुरसळ कटुंबांच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News