भाकप व किसान सभेच्यावतीने शेवगाव येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आदोंलन करण्यात आले


भाकप व किसान सभेच्यावतीने  शेवगाव येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आदोंलन   करण्यात आले

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण: राज्य सहसचिव ॲड. सुभाष लांडे , ज्येष्ठ नेते कॉ. शशिकांत कुलकर्णी, कॉ. संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले - लॉकडाऊन काळातील  सरासरी वाढीव वीजबिलात सवलत देण्याऐवजी ते वसुलीची तयारी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत शासनाने वाढीव वीजबिल रद्द करावे, लॉकडाऊन काळातील सर्व वीजबिल  माफ करावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी केली आहे.

     भाकप व किसान सभेच्यावतीने  शुक्रवारी (दि.२० ) शेवगाव येथे महावितरणच्या कार्यालयासमोर ॲड. सुभाष लांडे , ज्येष्ठ नेते कॉ. शशिकांत कुलकर्णी, कॉ. संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य शासनाच्या भूमिकेचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी महावितरणचे उपअभियंता शैलेश लोहारे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कोरोनामुळे यंदा मार्च ते ऑगस्ट या लॉकडाऊनच्या सहा महिने काळातील वाढीव बिलाबाबत शासनाने सवलत देण्याची भूमिका आधी जाहीर केली होती. पण अचानकपणे ती मागे घेऊन सक्तीने वसुली करण्याचा घेतलेला निर्णय निषेधार्ह आहे. लॉकडाऊन काळातच सरकारने वीजदर वाढीची घोषणा केली होती.आता वसुलीचा निर्णय म्हणजे  जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राज्य सरकारचे वीज उद्योगाचे उदारवादी, खाजगीकरण करण्याचे धोरण वीज ग्राहकांना वाढीव बिलास कारणीभूत आहे.  वाढीव वीजबिल रद्द करावे, लॉकडाऊन काळातील सर्व वीजबिल  माफ करावे, शेतकऱ्यांना सरसकट वीजबिल माफ करावे, वीजबिल सक्तीने वसुल करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनात दिला आहे. 

या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशीनकर,  बाजार समितीचे संचालक अशोक नजन, आत्माराम देवढे, दत्ता आरे,  रत्नाकर मगर, प्रेम अंधारे, विश्वास हिवाळे, बापूराव लांडे, अक्षय खोमणे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News