संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम २०२०-२१ साठी संरक्षित उभ्या भुसार,बारमाही,फळबागा तसेच सर्वच प्रकारच्या पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सात नंबर पाणी अर्जाची १५ नोव्हेंबर रोजी संपलेली मुदत वाढविली असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप सात नंबर अर्ज भरले नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणी देण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असणारे सात नंबर पाणी मागणी अर्ज १५ नोव्हेंबर पर्यंत भरण्याची मुदत पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली होती.मात्र दिवाळीचा सण, कोरोनाचे संकट आदी कारणांमुळे अनेक शेतकरी आपला पाणी मागणी अर्ज मुदतीच्या दाखल करू शकले नाही. त्यामुळे हे शेतकरी पाण्यापासून वंचित राहून त्यांचे नुकसान होणार होते. याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाकडे सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून पाटबंधारे विभागाचे वतीने सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक ३० नोव्हेंबर पर्यंत लाभधारक शेतकरी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करू शकणार आहे. त्यासाठी अजूनही ज्या शेतकऱ्यांनी आपले सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल केले नाही त्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज सबंधित विभागाकडे दाखल करावे असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.