अनिल सदाफुले याचा प्रामाणिकपणा पैशाने भरलेले पाकिट शेतकर्याला केले परत


अनिल सदाफुले याचा प्रामाणिकपणा  पैशाने भरलेले पाकिट शेतकर्याला केले परत

समाजातील तरुण पिढीने प्रामाणिकपणाचा आदर्श घ्यावा - राजेंद्र गावडे

शिरुर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

                  शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरातील शिनगरवाडी येथील शेतकरी इंद्रभान खामकर यांचे हरविलेले पाकीट रोख रक्कमेसह पोलिस हवालदार राजेंद्र गवारे व अन्य नागरिकांच्या उपस्थितीत टाकळी हाजी दुरक्षेत्र पोलिस चौकीचे 

सहाय्यक पोलिस कर्मचारी अनिल सदाफुले यांनी शेतकरी इंद्रभान खामकर यांना परत केले.याबद्धल सर्व परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. 

                   टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील शिनगरवाडी येथील शेतकरी इंद्रभान खामकर यांचे त्यात असलेल्या कागद पत्रासह पैशाने भरलेले पाकिट शिनगरवाडी ते गुणोरे या परिसर शेतात काम करण्यासाठी जात असताना रस्त्यात कोठे तरी गहाळ झाले(पडले) असता घरी गेल्यानंतर त्यांच्या ते लक्षात आले.त्यांनी ताबडतोब हरविलेले पाकीट परत करण्याचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन

केले.पण योगायोग इंद्रभान खामकर यांचे रोख रक्कम पाच हजार व कागदपत्रासह भरलेले पाकीट टाकळी हाजी दुरक्षेत्र पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस कर्मचारी अनिल सदाफुले यांना सापडले.  त्यांनी शिनगरवाडी येथील शेतकरी इंद्रभान खामकर यांना फोन ( भ्रमणध्वनी) करून आपले पाकिट माझ्याकडे असल्या बाबतची माहिती दिली व त्यांच्याकडे ते परत केले.यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे,टाकळी हाजीचे आदर्श सरपंच दामुशेठ घोडे,टाकळी हाजी दुरक्षेत्र पोलिस चौकीचे पोलिस हवालदार राजेंद्र गवारे व पोलिस कर्मचारी,पोलिस मित्र धोंडीभाऊ गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्या ज्योती वाघमारे,वंदना खामकर आदी मान्यवरांसह परीसरातील ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले तर अनिल सदाफुले यांनी समाजातील तरुण पिढी समोर कळत नकळत प्रामाणिकपणाचा आदर्शचं ठेवला आहे.तरुणांनी याचा आदर्श घ्यावा असे आवाहन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले.याबद्धल सर्व परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News