कांद्यासह,भाजी पाल्याचे भाव गडगडले,शापू 2 रुपये तर कोथंबीर 1 रुपयाला जुडी,बळीराजा हवालदिल


कांद्यासह,भाजी पाल्याचे भाव गडगडले,शापू 2 रुपये तर  कोथंबीर 1 रुपयाला जुडी,बळीराजा हवालदिल

विठ्ठल होले  विशेष प्रतिनिधी: कोरोना मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याच वस्तूला बाजार भाव मिळत नाही, लॉक डाऊन काळात शेतकऱ्यांना शेतमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती, कोरोना,लॉक डाऊन संपत नाही तोच परतीच्या पावसाने होते नव्हते ते हिरावून नेले,दसऱ्याच्या काळात 100 रुपयापर्यंत भाव मिळाला तर सर्वांची आगपाखड झाली,आजची परिस्थिती इतकी भयानक आहे,कांदा 25 ते 40 रुपयांवर आला आहे तर कोथंबीर अक्षरशः जागेवरच सोडून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे,कोथिंबिरीच्या जुडीला 1 रुपया भाव मिळाला तर शापु भाजीला  2 रुपये इतर सर्वच भाज्यांचा भाव ढासळला असल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे, आता कुठे गेले महागाई म्हणणारे,शेतमालाला थोडासा बाजार भाव मिळाला तर महागाई वाढली म्हणून ओरड सुरू होते मग आज कोणत्याच पाले भाज्यांना बाजारभाव नाहीतर शेतकऱ्याचे दुःख कोणालाच दिसणार नाही,तुमची सहानुभूती नको आहे बळीराजाला तो समर्थ आहे परिस्थितीशी दोन हात करायला,फक्त शेतमालाला रास्त भाव मिळावा हीच अपेक्षा आहे,अशी मनातील खदखद एका बळीराजाने व्यक्त केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News