वीज कंत्राटी कामगारांचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.प्रवीण दरेकर यांना कोरोना काळातील विविध समस्या विषयी निवेदन


वीज कंत्राटी कामगारांचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.प्रवीण दरेकर यांना कोरोना काळातील विविध समस्या विषयी निवेदन

कुरकुंभ:प्रतिनिधी

  दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.प्रवीण दरेकर यांची पुण्यात भेट घेतली राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना मागील वर्षभरात रोजगाराचेसह विविध समस्यांनी घेरले असून उर्जामंत्री यांचे खात्यातील कामगारांच्या प्रश्नांकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. या बाबत महाविकास आघाडी सरकार काळात सतत शासनाकडे पाठपुरावा केला ८ जून २०२० रोजी मा. मुख्यमंत्री, मा.उर्जामंत्री, मा.प्रधान सचिव ऊर्जा, व कंपनी प्रशासनाकडे संघटनेने कामगार हिताचे पत्रव्यवहार केले. वेळोवेळी कामगारांनी एकत्र येऊन निदर्शने केली,आंदोलने केली मात्र उर्जामंत्री मा. ना. नितीनजी राऊत यांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही.

राज्यातील महावितरण महापारेषण व महनिर्मिती कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालत जनतेला अखंडित व सुरळीत वीज पुरवठा केला, कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावत काम केले. लॉकडाऊन काळात २६ कंत्राटी कामगार मृत्यूमुखी पडले तर अनेक जखमी झाले, यांना सरकारने आर्थिक मदत तर दिलीच नाही, मात्र एन दिवाळीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक कामगारांना पगार मिळाले नाही तर अनेकांना बोनस मिळाला नाही, ऑक्टोबर २०२० साली जाहीर झालेली २०% पगारवाढ या सरकार काळात अजून अनेक ठिकाणी कामगारांना मिळाला नाही, 

एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसे नाही असे म्हणत असताना

कोरोना काळात कोणाच्याही नोकऱ्या जाता कामा नये असे शासन आदेश असतांना १०% कामगारांना  आर्थिक कारण देत परिपत्रक काढून कामावरुन कमी केले तर एकीकडे १५,००० विविध पदांच्या भरती करत आहेत मग या साठी सरकार कडे कुठून पैसे येणार आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

भरती करताना आधी कार्यरत कंत्राटी कामगारांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना प्राधान्य द्यावे, वयात सवलत द्यावी, आरक्षण द्यावे व नंतरच भरती करावी, अनुभवी कामगारांना आय टी आय शिक्षण नाही म्हणून आता कोणाला कामावरून कमी न करू नये, मुळात ही भरती प्रक्रिया चुकीच्या निकषांच्या आधारे केली आहे, आय टी आय चे मार्क ग्राहय न धरता येथे SSC चे मार्क ग्राहय धरतात हे चुकीचे आहे, त्या उद्योगाच्या शिक्षणावर आधारीतच ही भरती प्रक्रिया अपेक्षित आहे. ही दुरुस्ती होई पर्यंत भरती राबवू नये या विविध कामगार हिताच्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिले, लवकरच या बाबत मा.मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांच्याशी बोलून मंत्रालयात बैठक आयोजित करू असे आश्वासन मा.प्रवीण दरेकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. असंघटित कामगार क्षेत्रातील बिडी कामगारांना देखील बिडी उद्योगाचे किमान वेतन मिळावे या साठी विरोधी पक्ष नेते या नात्याने आपण पाठपुरावा करावा असे निवेदन भारतीय मजदूर संघाचे उमेश विश्वाद व अभय वर्तक यांनी प्रवीण दरेकर यांना दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News