शिर्डी ,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी,
डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना DPID कोविड १९ योध्दा २o२०-Dadasaheb Phalke Icon Award Films(DPIAF) पुरस्कार दि. २३- नोव्हेंबर २०२० रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
श्रीकांत रामचंद्र धुमाळ हे पुण्यामध्ये राहत असुन लॉकडाऊन कालावधीत गरजु नागरिकांना अत्यावश्यक अन्नधान्य किट १४०० गरजु नागरीकांना व आदिवासी पारधी समाजातील १७० गरजु परिवारांना दिले, हे काम पाहुन त्यांना DPIAFकोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यामध्ये काही द्रस्ट नी ऑनलाइन तर काही द्रस्टनी त्यांना प्रत्यक्ष बोलवून पुरस्कार दिला. डॉ.श्रीकांत धुमाळ हे निस्वार्थी भावनेने समाजसेवा गेल्या २१ वर्षापासुन करत आहे, तसेच समाजसेवा केल्याबद्दल त्यांना मानक डॉक्टर हि पदवी बहाल करण्यात आली. डॉ. श्रीकांत धुमाळ करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे व त्यांचे हे कार्य तरूण पिढीला प्रेरणादायी आहे,डॉ. श्रीकांत धुमाळ यांच्या कार्यास शुभेच्छा व भविष्यात त्यांनी अशाच प्रकारची गरजवंतांची सेवा करावी, त्यासाठी त्यांना ईश्वर चांगली शक्ती व आरोग्य यश किर्ती, उत्साह देवो, हि शुभकामना. सर्वांनी या प्रसंगी दिल्या