स्वस्त जनऔषधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा; पाचपुते आणि जगताप यांनी केले आवाहन !


स्वस्त जनऔषधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा;  पाचपुते आणि जगताप यांनी केले आवाहन !

श्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे

कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या दुर्धर व्याधींवर सर्वत्र उपलब्ध असणारे औषधे सामान्यांना परवडणारे नाहीत. शुभ्रा जनआरोग्यम ही संस्था आपल्याला हे औषधी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देत आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांनी केले. अमोल खेडकर यांनी बेलवंडी येथे सुरू केलेल्या स्वस्त जनऔषधी सेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शुभ्रा जनआरोग्यमचा उदघाटन सोहळा या उभयंताच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी सदाशिव पाचपुते होते.

जनआरोग्यमचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब पूलाटे यांनी स्वस्त जनऔषधी विषयी यावेळी विस्तृत माहिती दिली. प्रास्ताविक प्रशांत खेडकर यांनी केले तर आभार अवधुत राऊत यांनी मानले. यावेळी सरपंच संग्राम पवार, नवनाथ खेडकर, माऊली हिरवे, अतुल वाजे उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News