विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
स्वामी चिंचोली -येथील जयराम बाबासो जांभळे वय 23 या तरुणाला मोटर सायकलला कट का मारला म्हणून 9 ते 10 जणांच्या टोळक्याने घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे ठाणे अंमलदार धनंजय दाभाडे व मदतनीस विठ्ठल गायकवाड यांनी दिली आहे, सदर घटनेची हकीकत अशी की सदर तरुण जयराम जांभळे हा 18 /11/20 रोजी घरी टिव्ही पहात बसला असताना त्यांच्या गावातील रामकृष्ण सुदाम मत्रे हे लोखंडी गज घेऊन घरात शिरून जयराम यास ओढत बाहेर आणले असता बाहेर सुदाम मत्रे,शिवाजी मत्रे,जीवन सुदाम मत्रे,प्रशांत शिवाजी मत्रे,प्रशांत हनुमंत देसाई,लखन मत्रे,भाग्यवंत तात्याराम मत्रे,चंद्रकांत पोटे आणि इतर लोक बाहेर उभे होते, मला बाहेर आणताच हाणारे याला सर्वानी लाथाबुक्यांनी मारण्यास सुरवात केली,मला का मारता असे विचारले असता,रामकृष्ण मत्रे म्हणाले मला कट मारतो काय तुला लय माज आलाय असे म्हणत रामकृष्ण याने हातातील गज माझ्या डोक्यात,उजव्या हातावर,पायाच्या नडगिवर जोराने मारला व मला जखमी केले,त्यावेळी जयराम याची आई भांडण सोडवण्यास आली असता तीलाही शिवाजी मत्रे व प्रशांत मत्रे यांनी पदराला ओढून लाकडी दांडक्याने डोक्यात व हातावर जबर मारहाण केली आहे, वरील सर्व आरोपींविरोधात भदवि कलम 307,354,452,143,147, 148,149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाणे अंमलदार धंनजय दाभाडे यांनी सांगितले आहे, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमृता काटे पुढील तपास करीत आहेत.