अभी खाडे याचे उत्तुंग यश देशातील सर्वात अवघड समजली जाणारी जे ई ई मेन व ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण


अभी खाडे याचे उत्तुंग यश देशातील सर्वात अवघड समजली जाणारी जे ई ई मेन व ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

देशातील सर्वात अवघड समजली जाणारी जे ई ई ही मुख्य परीक्षा व ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण  करून आभी खाडे या विद्यार्थ्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (I.I.T.) खरगपूर या देशातील नामांकित संस्थेमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. 

आयआयटी संस्थेमध्ये प्रवेश मिळवणार्‍या पोलीस पाल्यास पोलीस विभागाकडून एक लाख बक्षीस (शिष्यवृत्ती) देण्यात येते. या शिष्यवृत्तीस तो पात्र झाला आहे. 

इयत्ता दहावी मध्ये सीबीएससी बोर्ड दिल्ली परीक्षेमध्ये त्यास 98.20% गुण मिळवून तो अनुसूचित जाती प्रवर्गात देशात तिसऱ्या क्रमांक मिळवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मॅरीड अवॉर्ड फॉर मेरिटोरिअल स्टुडन्ट (गुणवंत विद्यार्थी) जाहीर झाले आहे सदर अवॉर्ड मध्ये रोख रुपये 40000 जाहीर झाले आहेत

अभी खाडे याने स्कॉलरशिप परीक्षा ओलंपियाड एक्झाम व इतर परीक्षांमध्ये यश मिळवले आहे,त्याचा आयएएस होण्याचा मानस आहे. अभी खाडे हा डीवायएसपी मच्छिंद्र खाडे सीआयडी पुणे यांचा चिरंजीव आहे मच्छिंद्र खाडे हे दौंड तालुक्यातील काळेवाडी या गावचे रहिवाशी असून ते पुणे येथे स्थायिक झालेले आहेत, अभी खाडे याचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News