पुणे पदवीधरचे सूज्ञ मतदार मला विजयी करतील.....नीता ढमाले


पुणे पदवीधरचे सूज्ञ मतदार मला विजयी करतील.....नीता ढमाले

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी, पुणे (दि. 19 नोव्हेंबर 2020) पदवीधर, व्दिपदवीधर युवक, युवतींच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ सभागृहात त्यांना प्रतिनिधीत्व मिळावे या उद्देशाने घटनेत तरतूद करण्यात आली आहे. मी मागील दहा वर्षापासून नंदादीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा वर्गासाठी, खेळाडूंसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. माझे काम आणि जनसंपर्क याच्या बळावर पुणे पदवीधर मतदार संघातील सूज्ञ मतदार मला प्रथम पसंतीचे मतदान करतील व मी बहुमताने निवडून येईल असा विश्वास पुणे पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार नीता संजय ढमाले यांनी व्यक्त केला.

         गुरुवारी चिंचवड येथे ढमाले यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ढमाले म्हणाल्या की, पदवीधर मतदार संघाकडे सर्व राजकीय पक्षांचा दृष्टीकोन योग्य नाही. या मतदार संघात आपल्या पक्षातील नाराज, दुर्लक्षित कार्यकर्त्यांची सोय व्हावी म्हणून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे सामाजिक कार्य करणा-या उमेदवारांवर अन्याय होतो. या निवडणूकीत यावेळी निश्चित बदल घडेल. पदवीधर युवा, युवतींसाठी एम्प्लॉयमेंट कार्डच्या धर्तीवर सेंन्ट्रलाईझ सरकारी नोकरी पोर्टल बनविणे. नवं उद्योजकांना डीआयसी व बॅंक यांच्या मध्ये दुवा साधणारे व कर्ज प्रकरणे मंजूर करणारी सरकारी स्वायत्त संस्था स्थापन करणे. समान शिक्षण लागू करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी फी रेग्युलेटरी ॲथोरिटी सुरु करणे. खाजगी कंपन्याच्या नोकर भरतीसाठी हवे असणारे प्रॅक्टिकल कोर्सेस सुरु करणे. कोर्टाबाहेर बार रुम प्रमाणेच वकिलांसाठी निवारा असणारे केबिन बनवून देण्यासाठी पाठपुरावा करणार. जेणेकरुन उन्हाळ्यात पावसाळ्यात जे वकील उघड्यावर टेबल खुर्ची टाकून बसतात त्यांना निवारा मिळेल. शेतक-यांच्या पदवीधर मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांचा शेतमाल विक्रीसाठी जास्तीत जास्त एफपीसी सुरु करुन देणार. हि माझी ध्येय उद्दिष्ट्ये असून माझ्यासारख्या उच्च शिक्षित उमेदवाराला प्रथम क्रमाकांचे मत देऊन निवडून द्यावे असेही आवाहन नीता ढमाले यांनी यावेळी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News