अखंड भारतासाठी इंदराजींनी शेवटच्या श्‍वासापर्यंन्त प्रयत्न केले -आ.संग्राम जगताप


अखंड भारतासाठी इंदराजींनी शेवटच्या श्‍वासापर्यंन्त प्रयत्न केले -आ.संग्राम जगताप

राष्ट्रवादीच्या वतीने इंदिरा गांधी जयंती निमित्त अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) सर्वसामान्य घटकाला केंद्रभूत मानून इंदिरा गांधीनी कार्य केले. त्यांच्या रुपाने देशाला कणखर नेतृत्व मिळाले होते. अखंड भारतासाठी त्यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंन्त प्रयत्न केला. त्यांचे बलिदान न विसरता येणार असून, या कार्याला सलाम म्हणून प्रत्येकाच्या मनात आज त्या जिवंत असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, उबेद शेख, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, माजी जि.प. सदस्य दत्तात्रय वारे, ओबीसी सेलचे अमित खामकर, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, गणेश बोरुडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रा.माणिक विधाते म्हणाले की, कणखरपणे देशाचे प्रतिनिधत्व करुन इंदरा गांधींनी देशाची प्रतिमा उंचावली. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान न विसरता येणारे आहे. इंदिरा गांधी प्रेरणास्थान असून, त्यांचे विचार व कार्यशैली प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News