दौंड तालुक्यात कोरोनाची दुस-या लाटेची भिती!! पाटस येथील एकाच कुटुंबातील 10 जण कोरोना बाधीत,जनतेने गांभीर्याने घ्यावे-डॉ अशोक राजगे


दौंड तालुक्यात कोरोनाची दुस-या लाटेची भिती!! पाटस येथील एकाच कुटुंबातील 10 जण कोरोना बाधीत,जनतेने गांभीर्याने घ्यावे-डॉ अशोक राजगे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

-- दौंड तालुक्यात कोरोनाची दणक्यात एन्ट्री झाली आहे, ऐन दिवाळीत लोकांनी कोरोनाची दुसरी लाट आली आहे जनतेने गांभीर्याने घ्यावे, शासनाचे नियम पाळावेत असे डॉ अशोक राजगे यांनी म्हटले आहे, बेटवाडी परिसरात कोरोनाने कहर केला आहे,आज पाटस येथे 46 लोकांची अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये 15 जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात एकाच कुटुंबातील 10 व्यक्ती बाधीत आले आहेत, पुरंदर तालुक्यातील रिसेपिसे येथील 4 जण तर बोरिबेल येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती डॉ अशोक राजगे यांनी दिली आहे.दिवाळी लोकांनी कोरोनाला विसरून धुमधडाक्यात साजरी केली, प्रशासन,पोलीस कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देत नाहीत, परंतू लोक कोरोनाला हलक्यात घेत आहेत, कुठे कोरोना राहिलाय काही होत नाही असे म्हणून काही लोक नियम मोडीत काढत आहेत,अशा लोकांमुळे इतरांना त्याचा त्रास होत आहे, थंडीचा कडाका वाढत आहे आणि त्यामुळे कोरोनाची लागण जोरात सुरू झाली आहे, याचे उदाहरण बेटवाडी,पाटस येथील रुग्णाच्या वाढत्या संख्येने दाखवून दिले आहे, तरी जनतेने मास्क वापरलेच पाहिजे,सोशल डिस्टन्स पाळलेच पाहिजे,हात स्वच्छ धुतलेच पाहिजे,जसे दोन महिन्यांपूर्वी काळजी घेत होते तशीच काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News