कोरोनामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ,माळेवाडी करांनी दिला माणुसकीचा हात


कोरोनामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ,माळेवाडी करांनी दिला माणुसकीचा हात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत,छोटे मोठे व्यवसायिक मेटाकुटीला आले आहेत,तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते त्यामुळे जागरण गोंधळ करणारे कलावंत,यात्रा ,जत्रा रद्द झाल्यामुळे तमाशा कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, सद्या महाराष्ट्रात मंदिरे खुली करण्याची परवानगी मिळालेली आहे. असे असले तरी कोरोनाचं सावट अद्याप संपलेलं नाही. अशातच गांवोगावी यात्रा सुरु झालेल्या आहेत. परंतू तमाशा कलावंतांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची गुजरान करणाऱ्या तमाशा कलावंतांना आधार म्हणून दौंड तालुक्यातील  माळेवाडीच्या ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत,माणुसकीचा हात देत गावामध्ये  नेहमी गावच्या यात्रेला आपली कला सादर करणारे बारामती येथील ईश्वर बपु पिंपरीकर तमाशा मंडळास रु.11,111/- रुपयाची मानधन मदत म्हणून जाहीर सुपुर्द केली. ही संकल्पना सर्वांचे आधार स्तंभ व गांवचे प्रमुख म्हणून महेश  भागवत यांनी ग्रामस्थांसमोर मांडताच सर्व ग्रामस्थांनी यांस अनुमोदन दिले. नक्कीच यामुळे गावाची एकी व सामाजिक बांधिलकी यातून दिसून येते.यावेळी महेश भागवत, हरिष खोमणे,महादू भागवत,सिताराम भागवत,यशवंत बारवकर,आप्पा भागवत, बबन भागवत,रमेश झगडे,दादा भागवत  दत्तू टेंबरे,किसन भागवत,तमाशा फडाचे मालक,कलाकार तसेच माळेवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News