आर..र...र... खतरनाक ? शिरुर शहरासह तालुक्यात माजला गुंडाराज ...तर हत्यार धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल


आर..र...र... खतरनाक ?  शिरुर शहरासह तालुक्यात माजला गुंडाराज ...तर हत्यार धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल

शिरुर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

              शिरुर तालुक्यातील निमोणे येथे जवळपास सात आठ जणांच्या टोळक्याने ट्रक जाऊन देण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याने गाडीच्या काचा फोडून मारहाण करून पस्तीस तोळ्याची सोन्याचे चैन जबरदस्तीने हिस्काऊन ते घेऊन पळून गेले परंतु या प्रकारात झालेल्या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले असुन शिरूर पोलीस स्टेशन येथे अकरा जणांवर खंडणी मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलिस निरक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली.

         पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की फिर्यादी पांडुरंग गरुड यांच्या फिर्यादीवरून फिर्यादीचा ट्रक शिरसगाव काटा येथे खडी खाली करून येत असताना, ट्रक ड्रायव्हर निमोणे येथील तरुणांनी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून ट्रकच्या काचा निमोने गावच्या चौकात फोडल्याने ट्रक ड्रायव्हर यांनी मालक गरुड यांना सांगितल्यावर, फिर्यादी ट्रकचे मालक पांडुरंग गरुड व त्याचा मित्र राजेश कोळेकर हे फॉर्च्युनर गाडी घेऊन घटनास्थळी गेले असता त्यांनी तेथे गेल्यावर संकेत काळे याला फोन लावुन कुठे आहे असे विचारले असता आम्ही शाळे जवळ बसलो आहे.त्या ठिकाणी येण्यासाठी सांगितले असता मी तिथे जाताच माझ्या डोक्याला आरोपी यांनी रिवाल्वर लावून तुझी गाडी गावातून जाऊन द्यायची असेल तर प्रत्येक ट्रीपला दोन हजार रुपये द्यावे लागतील नाही तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणता अक्षय काळे याने त्याच्या हातातील तलवार फिर्यादीच्या फॉर्च्यून गाडी नं.( एम एच १२जे व्ही ६१९९ ) हिच्यावर मारली व गाडीच्या काचा फोडल्या तर शुभम काळे यांनी डोक्यात गज मारुन  डोक्याला दुखापत केली, इतर आरोपी व तीन अनोळखी हातातील लाकडी दांडके लोखंडी रॉड याने फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण करत दमदाटी केली आणि गळ्यातील दोन तोळ्याची चैन पस्तीस तोळे घेऊन गेले असल्याची तक्रार शिरुर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.

              फिर्यादी पांडुरंग नारायण गरुड (रा.चव्हाण वाडी ता. शिरूर, जि.पुणे) यांनी दिलेल्या  फिर्यादी वरून संकेत काळे, शुभम काळे, अक्षय काळे, पप्पू काळे, सार्थक जगदाळे, रोहित कर्डिले, ओंकार जवळ, शुभम जगदाळे या आठ जणांबरोबर त्याचे साथीदार इतर तीन अनोळखी अशा अकरा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News