पाडव्याचे दिवशी शहिद वीर जवानांना कोपरगांव भाजपाच्या वतीने आदरांजली !!


पाडव्याचे दिवशी शहिद वीर जवानांना कोपरगांव भाजपाच्या वतीने आदरांजली !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

भारतीय सीमेवर डोळयात तेल घालुन अहोरात्र देशाचे रक्षण करणारे वीर जवान हे आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावतात. अशा देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मरण म्हणून दिपावली पाडव्याचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरांजलीचा कार्यक्रम पार पडला.          

दिपावली पाडव्याचे औचित्य साधून कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एक पणती शहिद वीर जवानांसाठी या उपक्रमा अंतर्गत कोपरगांव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान,माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे,भाजप अहमदनगर जिल्हासचिव कैलास खैरे, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रदीप नवले,बाळासाहेब आढाव ,सतीश चव्हाण, नगरसेवक वैभव गिरमे, विवेक सोनवणे, अकबर शेख, शरद त्रिभुवन, विनोद  चोपडा, सत्येन मुंदडा, सुशांत खैरे, रविंद्र रोहमारे, अर्जुन मोरे,  गोपीनाथ गायकवाड ,सोमनाथ ताकवले, स्वप्नील  हगवणे, सतिश रानोडे, संजय तुपसैंदर, रोहन दरपेल, फकीर मंहमद पहिलवान, शंकर बिऱ्हाडे, आजी माजी नगरसेवक, नागरिक, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News