घटनाकार मैत्री संघ आणि देशभक्ती सेवा मंचच्या वतिने दिवाळी फराळाचे वाटप ! !


घटनाकार मैत्री संघ आणि देशभक्ती सेवा मंचच्या वतिने दिवाळी फराळाचे वाटप ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगाव शहरातील घटनाकार मैत्री संघ व देशभक्ती सेवा मंचच्या वतिने स्मशानभूमी येथील कर्मचारी असलेल्या (मसानजोगी) बांधवाना फराळ वाटप करुन दिवाळी साजरी केली.

 दिवाळी.सण म्हटले की,लहान पासून मोठ्या पर्यत सर्व आनंदी असतात.हा सण आनंदाचा समजला जातो.प्रत्येक जण आपले नातेवाईक मित्र यांना घरी बोलावून फराळ केला जातो.जो शोषित समाज आहे.अशा बांधवाना भेटून दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घटनाकार मैत्री संघाने घेतला व शहरातील बाजारतळ येथील स्मशानभूमीत वास्तव्यात असलेल्या कर्मचारी ( मसानजोगी) यांना भेटून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांना फराळ वाटप केला. स्मशानभूमीत दिवसाही माणसे जाण्यासाठी घाबरतात.या ठिकाणी घटनाकार मैत्री संघ,देशभक्ती सेवा मंचने गोरगरिबा बरोबर दिवाळी साजरी करुन फराळ वाटप केला आहे.त्यामुळे समाजाला आर्दश निर्माण झाला आहे.

यावेळी घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतम बनसोडे,घटनाकार मैत्री संघाचे संस्थापक नितिन बनसोडे,देशभक्ती सेवा मंचचे अध्यक्ष रवींद्र जगताप,दत्तु घोडेराव,पगारे,संजय ससाणे,विशाल आव्हाड,सोपान सावंत,प्रताप फरताळे अल्ताफ शहा,गौतम जमधडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News